नाशिक

साधुग्राम स्थलांतर हरकत

CD
टूडे साठी -------------- साधुग्राम आरक्षण स्थलांतरावर नगरसेवक मुदलियार यांची हरकत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : मौजे नाशिक गट क्रमांक ३४३ च्या भूसंपादन जाहीर सूचनेला नगरसेवक कैलास मुदलियार यांनी आयुक्तांकडे कायदेशीर हरकत नोंदवली आहे. सर्व्हे क्रमांक ३४८ मधील साधुग्राम आरक्षण क्रमांक ९० चे १३ हजार ८८० चौरस मीटर क्षेत्र २०२४ मध्ये गट क्रमांक ३४३ मध्ये स्थलांतरित करताना वैधानिक प्रक्रिया पाळली नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. महापालिकेने साधुग्रामसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली असून, याच गटात पूर्वी आरक्षण स्थलांतर झाले आहे. या स्थलांतराला महासभेने मंजुरी दिली होती. मात्र एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार शासन आणि नगररचना संचालकांना अहवाल पाठवणे बंधनकारक असताना तो पाठवला आहे का, तसेच स्वतंत्र विकास आराखडा फेरबदलाची गरज होती का, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोंदवहीतच पर्यायी जमीन ही मंजुरीतील रचनाबंधात नसल्याची नोंद असताना मंजुरी कशी दिली, दोन्ही जागांमधील अंतर ४८९ मीटर असताना ३०० मीटरच्या विशेष तरतुदीचा आधार कसा घेतला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मूळ जागेला १८ व ३० मीटर रस्ते असताना पर्यायी जागेला केवळ १२ मीटर कच्चा रस्ता आणि ती जागा मलनिस्सारण केंद्रालगत असल्याने सुरक्षेचा तांत्रिक अहवाल मागवण्यात यावा. तसेच नोंदणीकृत हस्तांतरण दस्त, प्रत्यक्ष ताबा, सातबारा नोंदी, हस्तांतरणीय विकास हक्क आणि चटई क्षेत्र निर्देशांकाच्या माध्यमातून दुहेरी मोबदला मिळणार नाही, याची खात्री करावी. हरकतीवर सुनावणी होईपर्यंत अंतिम कार्यवाही स्थगित ठेवावी आणि नियमभंग आढळल्यास स्थलांतर मंजुरी रद्द करावी, अशी मागणी मुदलियार यांनी केली आहे. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT