Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Lok Sabha Code of Conduct: आचारसंहिता लागू होताच पोलिस लागले कामाला! कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय नियोजन सुरू

Nashik News : पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयातील १३ पोलिस ठाणेनिहाय नियोजन सुरू झालेले आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयातील १३ पोलिस ठाणेनिहाय नियोजन सुरू झालेले आहे. संवेदनशिल मतदार केंद्रांसह जादा बंदोबस्त सज्जतेचा आढावा घेतला जात आहे. (Nashik Lok Sabha Code of Conduct police law order marathi news)

शहर पोलिस आयुक्तालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेच्या विशेष शाखेअंतर्गत विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाच्या माध्यमातून पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवडणुकीसंदर्भातील कामकाजाचा सातत्याने आढाव घेत आहेत.

आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने व्हीआयपी नेत्यांच्या सभा होतील. त्यासंदर्भात असणारा पोलिस बंदोबस्त आणि निवडणुकीसाठीची सज्जता अशा तीन कक्षांच्या माध्यमातून कामकाजाचा आढावा घेतला जाऊन त्यासाठीची सतर्कता आत्तापासून बाळगली जात आहे. (latest marathi news)

निवडणूक कक्षाच्या व्हीआयपी कक्षामार्फत राजकीय नेते, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संभाव्य दौरे, सभा आणि सुरक्षेसंदर्भातील नियोजन; बंदोबस्त कक्षामार्फत राजकीय सभा, संवेदनशील ठिकाणी, राजकीय दौरे व शहरातील बंदोबस्ताच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याचप्रमाणे, गोपनीय कक्षामार्फत शहरातील राजकीय, सामाजिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

तसेच, शहरातील संवेदनशिल ठिकाणांवर आत्तापासून गोपनीय विभागाकडून लक्ष ठेवून नोंदी घेतल्या जात आहेत. या साऱ्या बाबींचा आढावा पोलिस आयुक्तांकडून घेतला जात आहे. जेणेकरून आगामी निवडणूक काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठीची सर्वतोपरी सतर्कता पोलिस आयुक्तालयाकडून बाळगली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT