MLA Rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा उबाठा गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर

Lok Sabha Election : नाशिक लोकसभा निवडणूक 2024 नाशिक लोकसभेसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक लोकसभा निवडणूक 2024 नाशिक लोकसभेसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. वाजे यांची उमेदवारी जाहीर होताच फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Nashik Lok Sabha Ubatha Group candidates announced to Rajabhau Waje marathi news)

उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज (दि. 27) जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे.आहे. राजाभाऊ वाजे शिवसेनेचे सदस्य म्हणून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते .  (latest marathi news)

ते एका राजकीय कुटुंबातील असून त्यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . त्यांची आजी रुक्मिणीबाई वाजे सन 1967 मध्ये सिन्नर (विधानसभा मतदारसंघ) च्या पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील 2009 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर (विधानसभा मतदारसंघ) येथून लढवली होती .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT