An gangster arrested from the suburbs. including the anti-gang squad of the city crime branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : तोडफोड करणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या; शहर गुन्हेशाखेच्या गुंडा पथकाकडून अटक!

Nashik News : शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण करुन तिचा हातगाड्याची तोडफाड व पैशांची लुट करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उपनगर परिसरातील शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण करुन तिचा हातगाड्याची तोडफाड व पैशांची लुट करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. संशयितांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन हातगाडी चालक महिलेसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक मारहाण केली होती. (Nashik Crime News)

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. किरण रतन पाटील उर्फ गुजर (३५, रा. पंचशिलनगर, शिवाजी नगरमागे, उपनगर) असे मुसक्या आवळण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. गेल्या २७ जून रोजी पुणे महामार्गावरील रावल वाईन्सजवळ अलका साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे-फुटाण्याची विक्री करीत.

संशयित सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधव व दोन अनोळखी संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून साटोटे यांना शिवीगाळ व धमकी देत त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाणे व साहित्याची नासाडी करुन हातगाडी उलटवली होती. तसेच त्यांना दांड्याने मारहाण करुन गल्ल्यातील ७०० रुपये जबरीने काढून घेत लुट केली होती. (latest marathi news)

याप्रकरणी गेल्या गुरुवारी (ता. ११) उपनगर पोलिस ठाण्यात संशयित टोळक्याविरोधात दरोड्यासह मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी सागर सदावर्ते, रोहित जाधव यांना अटक केली होती. तर मुख्य संशयित किरण पाटील व साथीदार पसार होते.

पाठलाग करीत अटक

दरम्यान, मुख्य संशयित किरण पाटील हा उपनगरच्या पंचशीलनगर येथे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळाली होती. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी सापळा रचला. पाटीलला पोलिस आल्याची कुणकुण लागताच त्याने दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करुन पाटीलच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT