majhi shala sundar shala initiative  esakal
नाशिक

Nashik: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतिम टप्प्यात! विजयी विद्यार्थ्यांसह पालकांना मिळणार CMसोबत स्नेहभोजनाची संधी

Nashik : या उपक्रमात राज्यातील सुमारे एक लाख एक हजार शाळांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे.

विजय पगारे

इगतपुरी : राज्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’, ‘महावाचन महोत्सव’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, व ‘स्वच्छता मॉनिटर-टप्पा २’, या अभियानांची अंतिम टप्यात अंमलबजावणी सुरू आहे. लवकरच त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमातील विजयी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे एक लाख एक हजार शाळांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. (Nashik majhi shala sundar shala initiative marathi news)

उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहलेले संदेशपत्र २ कोटी ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे. या पत्रातून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ हा उपक्रम सुरू केल्याचे सूचित केले आहे.

राज्य शासनाने उपक्रमासाठी विकसित केलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. विद्यार्थी व पालकांसोबतची मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासह सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे.

या दोन स्वतंत्र उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांमधून पुरस्कारासाठी निवड होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम पात्र पाच विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार मिळणार आहे. विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य व वर्गशिक्षकास मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. (Latest Marathi News)

वाचनाची सवय वृद्धींगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांना घ्यायची आहे. उपक्रमाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यायची आहे. घोषवाक्य व सेल्फी या दोन उपक्रमांपैकी एका उपक्रमाचा व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे.

घोषवाक्य, सेल्फी व वाचन प्रतिज्ञा हे तीन उपक्रम संकेतस्थळावर १९ फेब्रुवारीपासून अपलोड करण्यास सुरवात झाली आहे. या उपक्रमाची माहिती संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल, अशी दक्षता घेण्याची सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT