नाशिक

महापौर जिनिव्हा परिषद

CD
पान चार सेकंड मेन ----------------------- (महापौर फोटो घ्यावा) नाशिकच्या हरित विकासासाठी जिनिव्हात मदतीची हाक महापौर हिमगौरी आडके यांचे संयुक्त राष्ट्रात सादरीकरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : शहराचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी विशेष आर्थिक व तांत्रिक मदत मिळावी, अशी ठाम मागणी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर केली आहे. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या ‘फोरम ऑफ मेयर्स’ या जागतिक महापौर परिषदेत त्यांनी नाशिकचा पर्यावरण आराखडा जगासमोर मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या युरोपियन मुख्यालयात ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील ७० हून अधिक प्रमुख शहरांचे महापौर, महापालिका आयुक्त आणि नागरी प्रशासनातील वरिष्ठ प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून नाशिकला या जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारी (ता. १३) ‘ग्रीन सिटीज अँड एन्व्हायरन्मेंटल क्वालिटी’ या विषयावरील विशेष सत्रात बोलताना महापौर आडके म्हणाल्या, की नाशिक हे केवळ कुंभनगरी किंवा द्राक्षनगरी नाही, तर ते वेगाने वाढणारे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. या वाढीसोबत पर्यावरणाचा समतोल राखणे हे आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. महापालिकेने २०३० पर्यंत प्रत्येक नागरिकामागे पाच चौरस मीटर हरित क्षेत्र उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी संयुक्त राष्ट्रे आणि विकसित देशांनी विकसनशील शहरांना विशेष निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. --------- नाशिकचे पंचसूत्री पर्यावरण मॉडेल जगासमोर परिषदेत महापौरांनी नाशिकमध्ये राबविल्या जात एक पेड माँ के नाम, उन्नत नाशिक अभियान, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, सिटी कॅनाल धोरण आणि कार्बन क्रेडिट्स आणि हरित अर्थव्यवस्था या उपक्रमांची माहिती दिली. शहरीकरण थांबवता येणार नाही, पण ते पर्यावरणपूरक कसे करता येईल याचा विचार करावा लागेल. नाशिकचे प्रयोग हे इतर भारतीय शहरांसाठी मॉडेल ठरू शकतात, मात्र यासाठी जागतिक सहकार्याची गरज आहे. - हिमगौरी आडके, महापौर, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; अप-डाउन मार्गावरील लोकल रखडल्या, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

Vani Crime : एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष दाखवून पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला लुटले...; तिघांना अटक

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

SCROLL FOR NEXT