Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Nashik News : जुन्या पालिकेच्या जागेवर संकुलासह इतिहास संग्रहालय : मंत्री भुजबळ

Nashik News : येवला‌ शहरातील रस्ता डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण, भूमिगत गटार, वाणिज्य संकुल, इतिहास संग्रहालयासह विविध कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

येवला‌ : शहरातील रस्ता डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण, भूमिगत गटार, वाणिज्य संकुल, इतिहास संग्रहालयासह विविध कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात जुन्या पालिकेच्या जागेवर व्यापारी संकुलासह इतिहास संग्रहालय साकारणार आहे. (Nashik History museum with complex old municipality yeola marathi news)

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लक्ष्मीआई मंदिर ते नागड दरवाजा रस्ता डांबरीकरण व काँक्रिटीकरण, गटारीसाठी ७० लाख, विंचूर रोड पाणी टाकी ते पारेगाव रस्ता काँक्रिटीकरण १ कोटी ८० लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरसमोर भूमिगत गटारीसाठी २० लाख, पारेगाव रोड भागात भूमिगत गटार, रस्ता काँक्रिटीकरण,

(कै.) भाऊलाल पहिलवान लोणारी व्यापारी संकुल परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण, भूमिगत गटारीसाठी प्रत्येकी ५० लाख, जुनी नगरपरिषद रस्ता ते वीज कंपनी ऑफिस ते सुंदरनगरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, भूमिगत गटारीसाठी १५ लाख, डॉ. साळुंखे हॉस्पिटल ते श्री. गाडेकर यांचे घर ते कलावती आई मंदिरापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरण व भूमिगत गटारीसाठी ३५ लाख, सोमनाथ गुंड ते जगदाळे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटारीसाठी १० लाख,

गवंडी गल्ली भागात रस्ता काँक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार, हमाल गल्ली भागात रस्ता काँक्रिरीटीकरण व भूमिगत गटारीसाठी प्रत्येकी २० लाख यांसह म्हसोबानगर स.नं.१४ पैकी मधील रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार, जाईचा मारुती तालिम ते संभाजी जेजुरकर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटारीसाठी बांधकाम प्रत्येकी १५ लाख, जुनी पालिकेच्या जागेवर वाणिज्य संकुल व इतिहास संग्रहालयासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT