nmc  esakal
नाशिक

NMC News : वस्त्रांतरगृह महापालिका येणार ताब्यात

NMC : गोदाआरती पुरोहित संघाने करावी की रामतीर्थ समितीने यावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला वेगळे वळण मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : गोदाआरती पुरोहित संघाने करावी की रामतीर्थ समितीने यावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला वेगळे वळण मिळाले. महापालिकेने पूर्वीच संघाच्या ताब्यात असलेले वस्त्रांतरगृह थकबाकीमुळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वस्त्रांतरगृह ताब्यात घेतल्यानंतर ते पाडण्याचीदेखील तयारी सुरू केली आहे. ( Municipal Corporation )

पंचवटी विभागीय कार्यालयाने ताब्यात घेण्यासाठी मिळकत विभागाकडे प्रस्ताव पाठविला. १९९२ मध्ये महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडाच्या बाजूला वस्त्रांतरगृह बांधले. गोदावरीमध्ये स्नानासाठी आलेल्या महिलांना कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वस्त्रांतरगृहाची उभारणी करण्यात आली होती.

मात्र, येथे पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाचा ताबा घेतला. महापालिकेने तीन वर्षासाठी पुरोहित संघाला नाममात्र भाडे तत्त्वावर करारान्वये दिले. करारनामा तीस वर्षांपूर्वी संपुष्टात आला. मात्र असे असले तरी दावा सोडला नाही. त्याशिवाय भाडेदेखील थकविण्यात आले. महापालिकेकडून अनेकदा नोटीस बजावण्यात आले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र गेल्या काही दिवसांपासून गोदाआरतीवरून वाद निर्माण झाल्यानंतर वस्त्रांतरगृह चर्चेत आले. करारनाम्यातील अटीवर शर्तींचा भंग झाल्याचे कारण महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाने ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात मिळकत विभागाकडे प्रस्ताव सादर केला असून, लवकरच ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.काही दिवसांपासून गोदाआरतीवरून वाद सुरू आहे.

पुरोहित संघाने रामतीर्थ समितीमार्फत गोदा आरतीला विरोध केला आहे. यामागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. गोदा आरती हा भाजपचा कार्यक्रम असताना याच पक्षाचे माजी आमदार पुरोहित संघाच्या बाजूने उभे राहिले आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्टीकडे स्थानिक पातळीवरून अहवालदेखील सादर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कारवाई सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT