A grand replica of the Ram temple in Ayodhya will be constructed at Panchvati Karanja by Shiv Janmotsav Samiti esakal
नाशिक

Shiv Jayanti 2024 : पंचवटी शिवजन्मोत्सव समितीकडून अयोध्या राममंदिराची भव्य प्रतिकृती

Shiv Jayanti 2024 : पंचवटी शिवजन्मोत्सव समितीने पंचवटी कारंजा येथे बहुचर्चित अयोध्या येथील राममंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंचवटी शिवजन्मोत्सव समितीने पंचवटी कारंजा येथे बहुचर्चित अयोध्या येथील राममंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दिवसरात्र हे काम सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष ॲड. गौरव गोवर्धने यांनी सांगितले. (Grand Replica of Ayodhya Ram Mandir)

दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती भव्य राममंदिराची प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. यासाठी मुंबई येथील ४० कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

राममंदिर साकारण्यासाठी विविध प्रकारचे मॉल्डस युद्धपातळीवर बनवले जात आहेत. ४५ फूट उंच, तर ५० फूट लांब ही प्रतिकृती साकारली जात आहे. येत्या १ ते २ दिवसांमध्ये देखाव्याचे काम पूर्णत्वास जाणार असून, त्यावर आकर्षक व विविध रंगांची विद्युत रोषणाई केली जाणार असल्याची माहिती गोवर्धने यांनी दिली.

तर मालेगाव स्टॅन्ड येथील शिवजन्मोत्सव समितीतर्फे देखावा उभारणी कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंडळातर्फे यंदा ६६ फूट उंच किल्ल्याची प्रतिकृती तयार करून त्यात २० फूट उंच महालक्ष्मी मूर्ती व त्यापुढे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा देखावा उभारण्यात येणार असल्याचे बाबासाहेब राजवाडे यांनी सांगितले.

पंचवटी कारंजा येथे रविवारी (ता. १८) रात्री प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मेवाटप केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT