nmc esakal
नाशिक

NMC News : पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्राकडून 342 कोटी

NMC : शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी खासदार गोडसे आणि महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी खासदार गोडसे आणि महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अमृत दोन अभियानांतर्गत महापालिका हद्दीत पाणीपुरवठा आणि पाइपलाइन संदर्भातील विविध कामांसाठी केंद्राकडून ३४२ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (nashik NMC water supply scheme marathi news )

शासनाने ३४२ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याने शहराच्या सहा विभागातील जुन्या तसेच खराब झालेल्या पाइपलाइन बदलण्यात येणार असून काही ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकल्या जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक ठिकाणी मुख्य पाइपलाइन आणि मुख्य पाईपलाईनच्या उपलाईन जुनाट झाल्याने गळतीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत होता.

काही ठिकाणी अपुऱ्या पाइपलाइन असल्याने पाण्यासाठी महिलांची ओरड होत असे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने शहरवासीयांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठीचा प्रस्ताव तयार करून निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता.

अमृत -२ अभियानांतर्गत केंद्राने नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव मंजूर केला असून यासाठी ३४२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांमध्ये शिवाजीनगर आणि गांधीनगर येथील वॉटर सिस्टीम प्लांटची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

सहा ठिकाणच्या पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य जुनाट झालेल्या पाइपलाइन बदलून त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन बसविणे, मुख्य पाईपलाईनद्वारे पुढे गेलेल्या पण खराब झालेल्या बारा ठिकाणच्या उप पाइपलाइन बदलून त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकणे, सहा विभागात प्रत्येकी एक - एक ठिकाणी नवीन ठिकाणी पाइपलाइन टाकणे, लव्हाटेनगर येथे एसआर बांधणे आदी कामे केली जाणार आहेत. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT