NMC Hoarding esakal
नाशिक

Nashik NMC News : बेकायदा होर्डिंग्ज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू

Nashik News : शहरात २८ होर्डिंग्जसाठी परवानगी असताना त्याहून अधिक म्हणजे जवळपास ६३ होर्डिंग्ज लावले गेल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : शहरात २८ होर्डिंग्जसाठी परवानगी असताना त्याहून अधिक म्हणजे जवळपास ६३ होर्डिंग्ज लावले गेल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला. यानंतर आता महापालिकेच्या विविध कर विभागाने बेकायदा होर्डिंग्ज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

विभागीय आयुक्तांच्या पत्राचा आधार घेत तीन वर्षात बेकायदेशीर उभारलेल्या होर्डिंग्जच्या माध्यमातून किती महसूल मिळवला गेला याची माहिती घेऊन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली. (Nashik NMC illegal hoardings started news)

जाहिरात व परवाने विभागातील कर्मचाऱ्यांनी करारातील अटी व शर्ती बदलून संगनमताने होर्डिंग्ज घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नाशिक आउटडोअर ऍडव्हर्टायझेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला होता. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चौकशी समिती गठित केली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने अहवाल आयुक्तांकडे सादर केला. निविदेतील अटी व शर्ती निश्चित करताना विशिष्ट मक्तेदारांना लाभदायक ठरेल अशा अटी तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यातून महापालिकेचा करोडो रुपयांचा कर बुडाल्याचा दावा असोसिएशनने केला.  (latest marathi news)

निविदा प्रक्रियेत मक्तेदाराला कार्यारंभ आदेश देताना मात्र अटी व शर्तीची उल्लंघन करून रस्ते, वाहतूक भेट, दुभाजक, इमारती, उद्याने वापरातील व वापरात नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर, जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिली होती. निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कार्यारंभ आदेश देताना मात्र प्रकाशित फलक, युनिपोल, एलईडी वॉल आदींना परवानगी दिली गेली. एकच दर लावले. यामुळे करोडोचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला.

ठेकेदाराला नोटीस

समितीच्या चौकशीत ११ ठिकाणी परवानगी मिळण्यापूर्वीच होर्डिंग लावल्याचे समोर आले होते. त्यामुळे विनापरवानगी उभारण्यात आलेले होर्डिंग्ज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून होर्डिंग्ज उभारण्यासाठी तयार करण्यात आलेले स्ट्रक्चर काढून घेण्याची नोटीस ठेकेदाराला बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT