NMC esakal
नाशिक

NMC News : सिंहस्थ कामांसाठी सल्लागार सर्वेक्षक

NMC : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून शहरात विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून शहरात विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. साडेतीनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यासह तपोवनातील ७०० एकर साधूग्रामसाठी जागा विकसित करणे व तांत्रिक पद्धतीची कामे केली जाणार आहे. या कामांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्राकलन करण्यासाठी सल्लागार सर्वेक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा होणार आहे. (nashik NMC Consultant Surveyor for Simhastha Works marathi news)

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिका पालक संस्था म्हणून काम पाहणार आहे. पायाभूत सेवा सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने जवळपास अकरा हजार कोटींचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. शासनाने अद्याप या आराखड्याला मंजुरी दिलेली नाही. कुंभमेळ्यासाठी शिखर समिती स्थापन केली आहे.

या समितीसमोर अहवाल सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी सिंहस्थासाठी तांत्रिक स्वरूपाची काही कामे केली जाणार आहे. त्यात बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन, विद्युत, उद्यान या विभागाशी संबंधित कामे आहेत. (latest marathi news

विविध रस्त्यांचे व घाटांचे रुंदीकरण, नदी नाल्यांची साफसफाई, मलनिस्सारण केंद्रांची उभारणी, पाणीपुरवठा विषयक कामे, विद्युत खांबांचे सर्वेक्षण, झाडांचे सर्वेक्षण, साधूग्रामचे सर्वेक्षण, लेआउट तयार करणे व त्याचे डिमार्केशन करणे, अंतर्गत व बाह्य वाहन तळांचे सर्वेक्षण करणे त्याचा ले-आउट तयार करणे, विविध जागा आरक्षित करणे, तात्पुरत्या स्वरूपात जागांचे अधिग्रहण करणे यासाठी सर्वेक्षण करून सविस्तर प्राकलन तयार केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.

या कामांचे होणार सर्वेक्षण

- साधूग्रामसाठी ७०० एकर जागा.

- शहरात साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते.

- नवीन रस्ते तयार करणे व अंतर्गत व बाह्य वाहन तळांचा विकास.

- जलशुद्धीकरण केंद्रे रुग्णालय पोलिस ठाणे, मंदिरे व मलनिस्सारण केंद्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT