NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : मृत जनावरांमुळे होणाऱ्या रोगराई, दुर्गंधीला आळा! मार्चमध्ये 857 प्राण्यांवर शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार

Nashik News : महापालिकेकडून प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्च महिन्यात एकूण ८५७ प्राण्यांवर विल्होळी येथील डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. परिणामी शहरात उघड्यावर मृत जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या आजार तसेच दुर्गंधीवर प्रतिबंध आला आहे. (Nashik animals cremated in mortuary news)

नाशिक शहराचा विस्तार वाढत असला तरी शहरात जवळपास तीस गावठाणांचा भाग आहे. या गावठाणामध्ये अद्यापही काही प्रमाणात शेती होते. शेतीला पूरक जनावरांचादेखील सांभाळ केला जातो. जनावरे मृत झाल्यानंतर खासगी मालक त्यांच्या पद्धतीने जनावरांची विल्हेवाट लावतात.

परंतु बहुतांश जनावरे हे रस्त्यावर मरून पडत असल्याने त्यातून रोगराईला सामोरे जावे लागत होते. ज्या भागात जनावरे मृत होत होती. तेथील नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मृत जनावरांवर विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नव्हती.

परंतु मागील वर्षात मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची सोय विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या आवारात करण्यात आली. आरोग्य विभागाकडून मृत जनावरांची वाहतूक करण्यासाठी लिफ्ट व्हॅनदेखील उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणाऱ्या तसेच खासगी गोठ्यांमध्ये मृत झालेल्या जनावरांवर अंत्यविधी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.   (latest marathi news)

मार्च महिन्यात डिझेल शवदाहिनीवर ८५७ मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी ६८९ लिटर डिझेल लागले, अशी माहिती यांत्रिकी विभागाची अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली.

मार्चमधील मृत प्राण्यांची संख्या

श्‍वान- ४१४

मांजर- ८६

वासरू- २५४

गाय- ६३

डुक्कर- ३०

बैल-१

म्हैस- ५

घोडे- २

शेळी- २

-----------------

एकूण : ८५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT