NMC esakal
नाशिक

NMC News : शैक्षणिक पात्रता नसताना कनिष्ठांना उपअभियंता पदाचे वेध; महापालिकेत पदोन्नती, बदल्यांचे अर्थकारण जोरात

NMC : बदलीतून महापालिकेत प्रथमच दहा टक्क्यांवर कार्यभार देण्याची पध्दत अमलात आल्याने अधिकारी वर्गातील संघर्ष टोकाला पोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : एकदा जम्पिंग प्रमोशन घेतल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने कार्यकारी अभियंतापदावर बसणाऱ्या उपअभियंत्यांच्या जागेवर बसण्याचे वेध शैक्षणिक अर्हता नसतानाही कागदपत्रांची जुळवाजुळव करून सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या अभियंत्यांना लागले आहे. नगररचना व बांधकाम विभागाकडे काम करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. (nashik NMC marathi news)

नगररचना व बांधकाम विभागात ज्येष्ठता डावलून अभियंतापदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. नगररचना विभागात एका कनिष्ठ अभियंत्याला नुकताच उपअभियंतापदाचा पदभार देण्यात आला आहे. या बदलीतून महापालिकेत प्रथमच दहा टक्क्यांवर कार्यभार देण्याची पध्दत अमलात आल्याने अधिकारी वर्गातील संघर्ष टोकाला पोचला आहे. कार्यकारी अभियंतापदाच्या सहा जागा रिक्त आहे.

त्यात एक जागा उपअभियंता पदावर तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर रवी पाटील यांना देण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना आहे. एक जागा दिव्यांगासाठी तर एक जागा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वाहतूक कक्षासाठी राखीव आहे. उर्वरित तीन कार्यकारी अभियंता पदासाठी दोन वर्षांपूर्वी जम्पिंग प्रमोशन घेतलेले तीन उपअभियंते उत्सुक आहे.

नियमानुसार सेवाज्येष्ठता यादी डावलून पदोन्नती (जम्पिंग प्रमोशन) मिळविले जात असताना महापालिकेत काहीही चालते या भावनेने उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदावर पदोन्नती मिळाल्यानंतर शैक्षणिक पात्रता धारण न करता कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्यांना उपअभियंता पदावर बसण्याची उत्सुकता वाढली आहे. (latest marathi news)

जोरदार फिल्डिंग

महापालिकेच्या नगररचना, बांधकाम व पाणीपुरवठा विभागात दहावी, कला व वाणिज्य पदवी धारण केलेले कर्मचारी अभियंत्यांची कामे करत आहे. सिव्हिल इंजिनिअर्स असिस्टन्स कोर्स, बिल्डींग कन्स्ट्रक्शन कोर्स, आयटीआयमधील सिव्हिल ड्राप्समन कोर्स, मेसन बिल्डींग कोर्स, व्होकेशनल डिप्लोमा, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आदी प्रकारचे कोर्स करून असिस्टंट व कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे.

विशेष म्हणजे दोन लाखांपर्यंतचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार असताना तब्बल वीस कोटींचे प्रस्तावावर स्वाक्षरी करत आहे. अशा अभियंत्यांना आता उपअभियंता पदाचे वेध लागले असून, त्यातून या पदांवर बसण्यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पाऊण कोटीचा रेट फुटला

बदल्या व पदोन्नतीच्या अर्थकारणाने टोक गाठले असून कार्यकारी अभियंता पदावर बसण्यासाठी पाऊण कोटीचा रेट फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पदावर बसण्यासाठी एका उपअभियंत्याने रेट ऐकून सपशेल माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव

परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेत

Kolhapur Mango Prices : हापूस 700 ते 1200 रुपये डझन! कोल्हापूर मार्केट यार्डात आंब्यांची आवक घटली, दरात 10-15 टक्क्यांची वाढ

Latest Marathi News Live Update: नेस्को ड्रॅग्स प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात

MLC Election 2026 : उद्धव ठाकरेंऐवजी दोन नावांची चर्चा, विधानपरिषदेवर कोण जाणार?

SCROLL FOR NEXT