NMC dog sterilization esakal
नाशिक

NMC News : नाशिक मनपाला श्‍वान निर्बीजीकरणासाठी मोजावी लागणार अडीच पट रक्कम!

Nashik News : महापालिकेकडून नव्याने देण्यात आलेल्या श्वान निर्बिजिकरणात एका श्‍वानामागे महापालिकेला १ हजार ६५० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून नव्याने देण्यात आलेल्या श्वान निर्बिजिकरणात एका श्‍वानामागे महापालिकेला १ हजार ६५० रुपये मोजावे लागणार आहे. ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या नियमानुसार वाढ करण्यात आल्याने अडीच पट अधिक रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहे. नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी काम देण्यात आले असून सिडको, सातपूर, पूर्व व पश्चिम विभागात निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. (Nashik NMC dog sterilization marathi news)

महापालिकेच्यावतीने २००७ पासून श्‍वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबविली जाते. सोळा वर्षात महापालिकेने एक लाखांहून अधिक श्वान निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील श्वान निर्बीजीकरणाचे काम देण्यात आले होते. परंतु ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे.

परंतु मागील ठेका ज्या संस्थेने घेतला होता. त्या संस्थेकडे प्रमाणपत्र नसल्याने तातडीने काम बंद करण्यात आले. मागील वर्षी प्रतिश्वान निर्बीजीकरण करण्यासाठी ६५० रुपये इतका दर होता. ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने ३५ टक्के वाढ करून प्रति शस्त्रक्रिया ९९८ रुपये इतका दर मंजूर केला आहे. (Latest Marathi News)

त्यानुसार पंचवटी व नाशिक रोड विभागासाठी प्रति श्‍वान शस्त्रक्रियेसाठी १६५० रुपये न्यूनतम दर आला आहे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनला निर्मिती करण्याचे काम मिळाले आहे. २ हजार ४२४ श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

प्रतिसादाअभावी काम बंद

सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व पश्चिम विभागासाठी देखील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु या भागात श्‍वान निर्बीजीकरण प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या चार विभागांसाठी नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने निविदा व अटी-शर्ती तयार केले आहे. त्यानुसार पात्र संस्थांना काम दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT