टूडे साठी
------------
भौगोलिक प्रणालीद्वारे ‘एनएमआरडी’ विकास योजना
महापालिकेकडून मागविली पायाभूत सुविधांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याच्या दृष्टीने अग्निशमन पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती प्राधिकरणाने नाशिक महापालिकेला केली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या नगररचना विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरण क्षेत्रातील गावांसाठी भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे विकास योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेसाठी आधारभूत नकाशा विद्यमान जमीन वापर नकाशा आणि अहवाल तयार करण्यात येत आहे. विकास योजनेच्या कामासाठी प्राधिकरण क्षेत्रातील अग्निशमन पायाभूत सुविधांची अद्ययावत माहिती आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेकडून अग्निशमन केंद्रांची माहिती मागविण्यात आली आहे. माहिती संकलन व समन्वयासाठी महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांचा संपर्क क्रमांक कळविण्याचेही पत्रात नमूद आहे. प्राधिकरणाच्या विकास आराखड्याच्या नियोजन प्रक्रियेत अग्निशमन सुविधांची अचूक माहिती महत्त्वाची ठरणार असून, उपलब्ध सुविधा आणि प्रस्तावित केंद्रांचा तपशील नियोजनासाठी उपयोगी ठरणार आहे.
--------------चौकट
या माहितीचा समावेश असणार
प्राधिकरणाने मागविलेल्या माहितीत अग्निशमन केंद्राचे नाव, पत्ता, गाव किंवा प्रभाग क्रमांक व परिसर, तसेच केंद्र ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याचे नाव आणि अक्षांश-रेखांश यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र कार्यरत आहे की नाही, उपलब्ध अग्निशमन वाहने, रेस्क्यू वाहने व इतर यंत्रसामग्रीची संख्या, केंद्राचे सेवा क्षेत्र आणि प्रस्तावित किंवा नियोजित नवीन अग्निशमन केंद्रांचा तपशील मागविण्यात आला आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.