लोगो : सोमवारची मुलाखत
फोटो : 32958
पाच कोटींच्या निधीतून नाशिक अधिक समृध्द
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा निर्धार
लीड
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेले सुक्ष्म नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे नाशिकला पाच कोटींचे बक्षिस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मिळाले. या यशामागील खरे सूत्रधार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याशी साधलेला संवाद.
- किरण कवडे
…
प्रश्न : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश काय?
ओमकार पवार : गावातील दोन, तीन गटांमधील मतभेद आणि विरोधी भूमिकांमुळे गावच्या विकासाला अडथळे निर्माण होतात. गाव एकसंध ठेवून लोकांमध्ये एकोपा निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान सुरु केले आहे.
…
जिल्हा परिषदेने यात सहभागी होत काय बदल घडवला?
: अभियानाचा कालावधी निश्चित झाल्यानंतर आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातून उत्कृष्ट काम करणारे ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि काम करण्यास सुरुवात केली.
…
प्रत्येक टप्प्यावर येणारे आव्हान कसे पार केले?
: जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना थेट निधी दिल्यामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यातून काही गावांनी स्व:निधी मिळवला आणि काम उत्कृष्टरीत्या पूर्ण केले. पाणंद रस्ते तयार करण्यात लोकांची भूमिका निर्णायक राहिली. यातून प्रत्येक टप्प्यावर येणारे आव्हान सामूहिकरीत्या यशस्वीरीत्या पार करता आले.
…
ग्रामपंचायत विभागाची भूमिका काय राहिली?
: सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ग्रामपंचायत विभागाने निभावली. या विभागाच्या प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी गाव पातळीवर अत्यंत सचोटीने प्रयत्न केले. या अभियानाच्या काळात त्यांना आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नसल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हे साध्य झाले.
…
ग्रामसेवकांचा अनुभव कसा राहिला?
: जिल्ह्यातील पावणे तीनशे ग्रामसेवकांनी आपले अभियान काळातील अनुभव सांगितले. तब्बल साडेतीन तास त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर लक्षात आले की त्यांनी यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या कष्टामुळेच आपला प्रथम क्रमांक आला.
…
जिल्ह्याला पाच कोटींचे बक्षिस मिळाले, त्याचे काय करणार?
: जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचे पाच कोटींचे बक्षिस मिळाल्याचा आनंद आहे. मिळणारी रक्कम कशी आणि कुठल्या बाबींवर खर्च करायची याविषयी शासन आदेश प्राप्त होईल. त्यानुसार आपण खर्च करणार आहोत. अभियानाच्या पुढील टप्प्यात निधी खर्च करून जिल्ह्याला त्याचा फायदा होईल, यादृष्टीने हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.