Pandit Ustad Taufiq Qureshi esakal
नाशिक

Nashik News : ‘इस्पॅलियर’ च्या विद्यार्थ्यांकडून रिसायकल प्लास्टिक बँण्डची निर्मिती

Nashik News : इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत परकेशन बॅण्ड तयार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत परकेशन बॅण्ड तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बँण्डला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर आता हेच विद्यार्थी विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाले आहे. (Nashik Production of recycled plastic marathi news)

येत्या शनिवारी २४ फेब्रुवारीला प्रख्यात तबलावादक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता शाळेतील १५०० हून अधिक विद्यार्थी एकाच वेळेस या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इस्पॅलियर स्कूलच्या युट्युब चॅनलद्वारे होणार असल्याने विद्यार्थ्यांची ही कला बघण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक डॉ. मनोज तत्वादी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे तसेच आपल्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा संदेश देण्यासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत हा सांगितिक बॅण्ड तयार करण्यात आला आहे.

प्लास्टिकचा कमी वापर करा, पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देत तब्बल १५०० विद्यार्थी एकाच वेळी या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन उपस्थित राहून या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण बघावे, असे आवाहन सचिन जोशी यांनी केले आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT