Rain esakal
नाशिक

Nashik Rain Update: जिल्ह्यात 4 दिवसांत 50 mm पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. चार दिवसांत तब्बल ५० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील १४ लहान-मोठ्या धरणांमधून विसर्ग सुरु आहे. (Nashik Rain Update 50 mm of rain in 4 days in district)

नाशिक जिल्ह्यात सात मोठी धरणे तर १७ मध्यम स्वरुपाचे प्रकल्प आहेत. त्यांच्यात सरासरी ८३ टक्के जलसाठा आहे. जून ते सप्टेंबरमध्ये ९३३ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. खरिप हंगाम हातातून गेल्यानंतर आता रब्बीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल.

सिन्नर, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून येते.

त्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी विहिरींना अजूनही पाणी उतरलेले नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले नाही. शेतकर्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पावसाची आकडेवारी (टक्के)

नाशिक-६६.६

मालेगाव -६४.९

बागलाण-६९.५

कळवण-९२.९

नांदगाव-५९.५

सुरगाणा-७६.९

दिंडोरी-११४.३

इगतपुरी-५२

पेठ-७१.५

निफाड-७१.६

सिन्नर-५९.७

येवला-८७.२

चांदवड-६६.८

त्र्यंबकेश्वर-७२.१

देवळा-६७.१

एकूण-६४.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT