nandgaon rain Sakal
नाशिक

नांदगावला सलग पाऊस, शहरवासीय पुन्हा धास्तावले

संजीव निकम


नांदगाव (जि. नाशिक) : मंगळवारी (ता. २१) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. गेल्या तेरा दिवसांपूर्वी शहरात झालेल्या सहा इंच एवढा मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडून पडले होते. लेंडी नदीपात्राच्या मधोमध असलेल्या टपऱ्यांमुळे पुराचे पाणी दत्तमंदिर, फुले चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक या मुख्य बाजारपेठेत शिरले होते. छोट्या व्यावसायिकांच्या शेकडो टपऱ्या पुरात वाहून गेल्या. सुदैवाने जीवित हानी टळली. आता पंचनामे अंतिम टप्प्यात पोचले असताना मंगळवारी दुपारपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे शहरवासीय काळजीत पडले आहेत.

लेंडी नदीपात्रातील पाण्याला मोकळी वाट मिळत नसल्याने या नदीचे पूरपाण्याने बहुचर्चित सबवे पुन्हा एकदा भरून ओसंडून वाहू लागला. शिवाय शहराच्या रेल्वे फाटकाबाहेरील येवला रोड, औरंगाबाद रोड भागातील जनतेचा शहराशी असलेला जनसंपर्क पुन्हा खंडित झाला. बाहेरगावी जाण्यासाठी गंगाधरीमार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून वाहने वळविली जात आहेत. दरम्यान, नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंबरी व लेंडी नदी यांच्या उगमावर मुसळधार पाऊस होत असून, नदीप्रवाहापासून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन नांदगाव पालिकेने केले आहे. ८ सप्टेंबरला आलेल्या महापुराने धास्तावलेल्या नांदगाव पालिका प्रशासनाने तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पाऊस सुरू होताच नांदगावकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पालिकेने सावधानतेचा इशारा सोशल मीडियावर वैयक्तिक, वेगवेगळ्या ग्रुपवर प्रसिद्ध केले आहे.

लेंडी नदीपात्राला खेटून असलेल्या चांडक प्लॉट येथील रहिवाशांची मात्र मोठी कुंचबणा झाली. एकीकडे नदीपात्र दुसरीकडे वाहणारा ओहोळ, अशा मध्यभागी असलेल्या रहिवाशांना पाण्याची पातळी ओसरण्यासाठी नेहमीप्रमाणे आजही प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, गांधीनगर येथील अरुण साळवे नावाची एक व्यक्ती पुरात वाहून जातांना अंकुश थोरात, विक्की शिंदे, सागर वाकळे, योगेश वाकळे या युवकांनी त्याला वाचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT