Vijay Karanjkar, Rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : भगूरमध्ये प्रचाररॅली काढत वाजेंकडून प्रचाराची सांगता

Lok Sabha Constituency : भगूर हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख असलेले विजय करंजकर यांनी तिकीट न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भगूर हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख असलेले विजय करंजकर यांनी तिकीट न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे येथील शिवसैनिकांना आपलेसे करण्यासाठी महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी थेट त्यांच्या बालेकिल्यात रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शनिवार (ता.१८) अखेरचा दिवस होता. महाविकास आघाडीचे वाजे यांनी भगूरला प्रचाररॅली काढली. या रॅलीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने करंजकर यांच्या बालेकिल्ला असलेल्या भगूरची निवड करत शक्तीप्रदर्शन केले. करंजकर हे ठाकरे गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहे.

करंजकर यांचे भगूरमध्ये वर्चस्व आहे. भगूर शहरात महाविकास आघाडीकडून रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, रॅलीस प्रारंभ झाला. रॅली दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. (latest marathi news)

‘अनेक दिवसांपासून मतदारसंघात प्रचार करत आहे. शहरी व ग्रामीण असा हा मतदारसंघ असल्याने वेगवेगळे प्रश्न आहेत. ही रॅली म्हणजे शक्तीप्रदर्शन नव्हे तर भगूरमध्ये प्रचार राहिला होता म्हणून या ठिकाणी रॅली काढून प्रचाराची सांगता करत असल्याचे वाजे यांनी सांगितले. रॅलीस जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

सेनेचे दोन्ही गट आमनेसामने

महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांची भगूर शहरातून रॅली सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमनेसामने आले. दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध झाले. हा प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कोणताही वाद झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT