Due to the rains, paddy cultivation work is going on in the villages of Bhanwad, Ware, Vanare in the western part esakal
नाशिक

Nashik Rice Farming : दिंडोरीत भात लावणी अंतिम टप्प्यात! पूर्व पट्ट्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा

Nashik News : यावर्षी मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर सूर्याचा पुष्य नक्षत्राने गेल्या रविवारी (ता.२१) मध्यरात्री पासून भीज पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बऱ्यापैकी येऊ शकेल असा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी : तालुक्यात सर्वच भागात भिज पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीच्या अंतिम कामाला वेग आला आहे. यावर्षी मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर सूर्याचा पुष्य नक्षत्राने गेल्या रविवारी (ता.२१) मध्यरात्री पासून भीज पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बऱ्यापैकी येऊ शकेल असा अंदाज आहे. (Nashik rice planting in Dindori in final stage)

दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील जानोजी, खेडगाव, वणीकसबे, राजापूर, जोपुळ, पालखेड, आंबे, वरवंडी, गणेशगाव, खतवड, ढकांबे, जऊळके दिंडोरी, मोहाडी,चिंचखेड, वनारवाडी, गणेशगाव, कुर्णोली, मातेरेवाडी, मावडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पावसाने समाधान आहे. पावसामुळे धरणांमध्ये व विहिरींमध्ये असलेल्या पाण्यात वाढ झाली आहे.

मात्र नदी नाल्यांना पूर येण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पश्चिम पट्यातील भनवड चारोसा लखमापूर जांबुटके, उमराळे, वणीखुर्द, गांडोळा, निगडोळ, करंजवण, खेडले कोशिंबे वारे वनारे परिसरात या पावसामुळे भात नागली वरई आदीची लागवड आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. (latest marathi news)

पूर्व पट्यात भुईमूग सोयाबीन

पूर्व भागात भुईमूग सोयाबीन पेरणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. अंतर्गत मशागतीत द्राक्ष बागेत तण काढणे, फवारणी करणे, रासायनिक खते पिकांना देणे आशा कामाला वेग आला आहे. तालुक्यात पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले आहेत तरीही नदी नाले अध्याय कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना रिमझिम पावसाला सामोरे जावे लागले असून पाणी पातळी तीन ते चार फूट ओल गेली आहे. त्यामुळे अजूनही या भागात समाधान कारक पावसाची अपेक्षा आहे.

धरणांना प्रतिक्षा

पालखेड ओझरखेड तिसगाव पुणेगाव वाघाड करंजवण आदी धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत समाधान कारक वाढ झालेली नाही.तरी पश्चिम पट्यातील भागात भात लावणीच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

Pune Police Raid : पुणे पोलिसांचा मास्टरस्ट्रोक! २५० जवानांनी उमरठीत अवैध शस्त्र कारखान्यावर टाकला सर्वात मोठा छापा

SCROLL FOR NEXT