फोटो : H32274
-------------
सौरऊर्जा प्रकल्प
नोंदणीसाठी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : वीजबिलातून सुटका मिळवण्यासाठी घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर’ योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना अनुदान दिले जाणार असून, या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून दोन दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भद्रकाली येथील शिवसेवा व्यायामशाळेत आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार फरांदे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक आदिती पांडे, राहुल शेलार, मंडल अध्यक्ष पवन गुरव, ऋतुराज पांडे, संदेश फुले, चेतन व्यवहारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यु. डी. पाटील, सहायक अभियंता तुषार नेमाडे, आर. एस. इप्पर आदी उपस्थित होते. या शिबिरात वीजबिलावरील नावात बदल आणि सौरऊर्जा योजनेच्या नोंदणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये, तर राज्य शासनाकडून १७ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. एकूण ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळाल्याने सौर यंत्रणा बसवण्याचा खर्च कमी होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अलीकडील वीजबिल, ग्राहक क्रमांक, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र व बीपीएल असल्याचा पुरावा सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.