नाशिक

प्रशिक्षणा आधीचं बारा कोटींची देयके अदा

CD
टूडे साठी महत्वाचे ---------------- प्रशिक्षणाआधीच बारा कोटींची देयके अदा महिला व बालकल्याण विभागाचा प्रताप; त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : महिला स्वावलंबनासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. काही वर्षांपूर्वी शिलाई मशीन वाटपावरून वादात सापडलेला हा ठेका आता पुन्हा नव्या प्रकरणाने चर्चेत आला आहे. १९ कोटी एकूण ठेक्याची किंमत होती. त्यातील बारा कोटी रुपये प्रशिक्षणापूर्वीचं संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आल्यानंतर चौकशी साठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी (ता. २२) स्थायी समितीची बैठक झाली. प्रारंभी सदस्य रंजना बोराडे यांनी कौशल्य प्रशिक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. समाजकल्याण उपायुक्त नितीन नेर यांनी उत्तर देताना १९ कोटींच्या या ठेक्याअंतर्गत मक्तेदाराला १२ कोटींचे देयक अदा करण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर सभागृहातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वास्तविक प्रत्येक प्रभागात प्रशिक्षण कार्यक्रम होत असल्याचे नेर यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु महिला सदस्यांनी प्रशिक्षणाबाबत कुठलीही माहिती नसल्याची माहिती सभागृहात दिली. भारती ताजनपुरे, जयश्री गाडेकर, अदिती पांडे, किरण गामणे, माधुरी बोलकर, राहुल दिवे, मुकेश शहाणे, योगेश गाडेकर, दीपाली कुलकर्णी, किरण दराडे यांनी प्रशिक्षणाची माहिती का दिली नाही? असा सवाल करतं प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका हद्दीत २४९ ठिकाणी प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती नेर यांनी सभागृहाला दिली व झालेल्या प्रशिक्षणाच्या बदल्यात संबंधित मक्तेदाराला १२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याचे सांगताना प्रशिक्षण स्थळांची यादी वाचण्यात आली. परंतु सदस्यांनी असे कुठलेही प्रशिक्षण प्रभागात सुरु नसल्याची माहिती दिली. ---चौकट पुरावे सादर करण्याची मागणी सातपूरच्या अशोकनगर भागातील सारिका अपार्टमेंटमध्ये प्रशिक्षण घेतल्याची माहिती नेर यांनी दिली, परंतु बोलकर यांनी प्रशिक्षण झाले नसल्याचा दावा केला. राहुल दिवे यांनी उपनगर, दीपाली कुलकर्णी यांनी इंदिरानगर येथील उल्लेख करताना प्रशिक्षण झाले नसल्याचा आरोप केला. प्रशिक्षणार्थींचे पुरावे सादर करण्याची मागणी करण्यात आली. प्रशिक्षण दिले नसल्याचे उघड झाल्यास ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या १२ कोटींची वसुली नेर यांच्या खासगी मालमत्ता विक्रीतून करण्याची मागणी सदस्य दिवे यांनी केली. ------चौकट अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप व महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, मुख्य लेखापरीक्षक बाबासाहेब गायकवाड यांची त्रिसदस्यीय समिती केली. पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT