tribal development department esakal
नाशिक

Nashik News : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा ॲड. गुळवेंना पाठिंबा

Nashik : आश्रमशाळा कर्मचारी संघटना, लोकशाही आघाडीच्या कर्मचारी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा कर्मचारी संघटना, लोकशाही आघाडीच्या कर्मचारी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (Tribal Development Department Staff Association Support to adv Gulve )

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी याबाबत पत्र प्रसिद्ध केले आहे. यात महाराष्ट्रातील शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, शिक्षक संघटना निष्प्रभ झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत शिक्षकांची कमालीची अवहेलना होत असताना मात्र विधान परिषदेत शिक्षकांच्या संवेदना मांडल्या जात नाहीत. शिक्षक आमदार राज्याच्या आणि देशाच्या शैक्षणिक धोरणावर बोलत नाहीत. (latest marathi news)

आदिवासी विकास विभागातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांची विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची वेळ, अनुदानित आश्रमशाळांच्या DCPS / NPS च्या हिशेबाचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, आदिवासी विकास विभागातील शिक्षण कक्षाचे बळकटीकरण अशा विविध प्रश्नांसाठी संघटना अनेक वर्षे संघर्ष करीत आहेत. मात्र, या विषयांवर कोणत्याही निवडणुकीत चर्चा झाली नाही.

पण, या शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या आताच्या निवडणुकीत या विषयावर प्रथमच चर्चा होत आहे. हे संपूर्ण आपल्या संघटनेच्या एकजुटीचे यश आहे. या निवडणुकीनंतरही हा संघर्ष सुरूच राहील. मात्र, आपल्या या मागण्यांसाठी पुढेही विधानसभा आणि विधान परिषद यातील लोकप्रतिनिधींचे पाठबळ आवश्यक असल्याने संघटनेने ॲड. गुळवे यांना पाठिंबा दिला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT