Amit Shah   esakal
नाशिक

Amit Shah News : केंद्रीय मंत्री अमित शहा फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक

Latest Political News : बुधवारी (ता. २५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. खासगी स्वरूपाच्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखली जाईल.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. २४ : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात ‘बॅकफूट’वर जावे लागल्याने आता विधानसभा निवडणुकीत नव्याने चमत्कार घडविण्याची तयारी पक्षाकडून सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. २५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. खासगी स्वरूपाच्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखली जाईल. (Amit Shah North Maharashtra officials meeting today)

मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. अवघ्या नऊ जागांवर पक्षाला समाधान मानावे लागले. त्यामुळे ‘बॅकफूट’वर आलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करताना ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असेल? कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जायचे? केंद्र व राज्य सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करावे? या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसीमध्ये मेळावा होत आहे.

राज्यात पाच टप्प्यांमध्ये बैठका होत असून, पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रची निवड शहा यांनी केली. उत्तर महाराष्ट्रात भाजपला अवघ्या दोन जागा लोकसभेला मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद भक्कम करण्यासाठी ही बैठक होत आहे. (latest marathi news)

या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या व विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्रातील खासदार व आमदार या वेळी उपस्थित राहतील.

विधानसभेसाठी नवीन पॅटर्न

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसल्यावर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत नवीन पॅटर्न अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण ३६ जागा असून, महायुती म्हणून २५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT