Corona esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात एक हजार ६८ कोरोना बाधितांवर उपचार सुरु

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत किरकोळ प्रमाणात घट होते आहे. मंगळवारी (ता.१७) जिल्‍ह्‍यात ऐंशी रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर नव्वद रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ०६८ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ४८, नाशिक ग्रामीण क्षेत्रात २५, मालेगावला एक तर जिल्‍हा बाहेरील सहा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दोन मृतांची नोंद झाली असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहेत.

सायंकाळी उशीरापर्यंत ७०७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ३८१ नाशिक ग्रामीण, १७८ मालेगाव तर नाशिक शहरातील १४८ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हा भरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८४८ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ८३२ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील चौदा रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संर्खया चार लाख चार हजार २२५ झाली असून, यापैकी तीन लाख ९४ हजार ६०४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आत्तापर्यंत आठ हजार ५५३ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT