lady finger vegetable esakal
नाशिक

Nashik News : खास फॉर्मुल्यामुळे ते बनले ‘भेंडी महाराज’; मित्राच्या गावठी उपायांची गावभर चर्चा

Nashik News : विविध कारणांमुळे अशाप्रकारच्या रंजक नावांचे किस्से हे त्या व्यक्ती व गावाला पडलेल्या नावावरून आपल्याला बघायला व ऐकायला मिळतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कोणाचे नाव कधी काय पडेल, हे काही सांगता येत नाही. विविध कारणांमुळे अशाप्रकारच्या रंजक नावांचे किस्से हे त्या व्यक्ती व गावाला पडलेल्या नावावरून आपल्याला बघायला व ऐकायला मिळतात. त्यामागे तशी गमतीशीर कहाणीदेखील असते. असाच काहीसा किस्सा नुकताच एका परिसरात घडला आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीस ‘भेंडी महाराज’ असे नाव पडले.

एका विशिष्ट वयानंतर माणूस जेव्हा विविध समस्यांनी त्रस्त झालेला बघायला मिळतो. ती समस्या त्याच्यासाठी ‘जगाचा ताप’ ही ठरते असे म्हणतात. तेव्हा त्याचे डॉक्टरांकडे चकरा मारण्याचे प्रमाण वाढल्याचे बघायला मिळते आणि जेव्हा तेथेही त्याचे समाधान होत नाही. तेव्हा तो अखेर आपल्या जवळच्या जिगरी मित्रांचे सल्ले घेण्यास सुरवात करतो.

अशाच एका वय झालेल्या व्यक्तीने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मित्राकडे कोणाला काही एक न सांगण्याच्या बोलीवर त्याचा खाजगीतील प्रॉब्लेम कसाबसा लाजेकाजे एकदाचा कथन केला. विशेष म्हणजे या मित्राकडे अनेक फॉम्युला आहेत, जे बहुतांश खरे ठरलेले आहेत. त्यावर त्या मित्र महोदयांनी त्यास कच्ची भेंडी खाण्याचा स्वस्तातील ‘गावठी’ उपाय सुचवला. (latest marathi news)

त्यावर त्या व्यक्तीनेही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता लागलीच त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरविले. मित्राच्या गाडीत असलेल्या पाच कच्या भेंड्या त्याने लागलीच खाल्या. आश्चर्य म्हणजे सकाळी त्या ज्येष्ठ मित्राने समोरच्या मित्रास फोन केला. दिलेला फॉर्म्युला सक्सेसफुल झाला की राव, असं म्हणत हर्षोल्हासाने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

नेमका तो आलेला फोन स्पीकरवर असल्यामुळे समोर बसलेल्या मित्रांनी तो ऐकला. मग काय सांगता दिवसभरात या भेंडी फॉम्युलाची चर्चा अख्खा गावभर पसरली आणि सर्वांनी पोट धरून धरून खदाखदा असण्याचा आनंद लुटला. ज्या मित्राने हा गावठी फॉम्युला सांगितला, त्या मित्राला आता सर्वजण ‘भेंडी महाराज’ म्हणून संबोधू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT