nashik sakal
नाशिक

नाशिक : मंत्र्यांकडूनच कोरोना नियमांचे उल्लंघन

गर्दीचे नियम धाब्यावर; प्रशासनाच्या दुजाभावामुळे नागरिकांकडून नाराजी

प्रमोद दंडगव्हाळ: सकाळ वृत्तसेवा

सिडको : ‘कोरोना नियम पाळा व कोरोना टाळा’ असे वारंवार केंद्र व राज्य शासन सांगत असतानादेखील या नियमांची पुरती विल्हेवाट लावण्याचे काम दस्तुरखुद्द दुसरे तिसरे कोणी नव्हे, तर दस्तुरखुद्द केंद्रीय आरोग्य राज्य मंत्रीच करत असल्याचे चित्र सिडकोतील एका लकी ड्रॉ कार्यक्रमात नागरिकांना याची देही याची डोळा बघायला मिळाले. यामुळे कोरोना गेला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेत देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. ऑक्सिजनचा अभाव, मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च, गोळ्या औषधांचा तुटवडा, स्मशानभूमीत लागलेल्या प्रेतांच्या रांगा ही सर्व दृश्य एखाद्या भयावह चित्रपटांप्रमाणे नागरिकांना बघायला मिळाली. आता पुन्हा तिसऱ्या लाटेसाठीची शक्यता सरकार अधूनमधून वर्तवित आहे. याकरिता कोरोना नियमांचे पालन करा, असे वारंवार आवाहन करत आहे. असे असतानाही ज्याठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नाही, त्या ठिकाणी नागरिकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येतात. आजही ते नियम कायम आहे. परंतु, या नियमांमध्ये प्रशासन दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच सिडकोमध्ये भाजप मंडल अध्यक्षांनी एका लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याकरिता शुक्रवारी (ता.१७) रात्री केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या विनामास्क दिसून आल्या. गर्दीचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. एका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन व्हावे, याबाबत उपस्थित नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे येथे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. अशावेळी लहान मुलांना सुद्धा धोक्यात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे मंत्र्यांनीदेखील मास्क घातल्या नसल्याचे दिसून आले. प्रशासनाच्या दुजाभावामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT