नाशिक

जिल्ह्यात ४१५ टँकरचे नियोजन

CD
जिल्ह्याला ४१५ टँकरची गरज भूजल पातळीत घट; मालेगाव, येवल्यात टँकर सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, भूजल पातळीत घट झाली आहे. मालेगाव आणि येवला तालुक्यांत आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जून २०२७ पर्यंत ४१५ टँकरचे नियोजन केले आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला. जून ते सप्टेंबरदरम्यान पावसात वारंवार खंड पडल्याने विहिरींनी तळ गाठला असून, पाझर तलाव आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठाही मर्यादित राहिला आहे. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पाणीसाठा, बाष्पीभवन आणि आगामी उन्हाळ्याचा विचार करता दिवाळीनंतर अनेक तालुक्यांत टँकरची गरज भासणार आहे. सध्या मालेगाव आणि येवला तालुक्यांतील १८ गावे व ३७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सुमारे ३७ हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने टंचाई निवारणासाठी तयारी सुरू केली आहे. तीन टप्प्यांत टंचाई आराखडा जिल्हा परिषद, जलसंपदा आणि कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासन टंचाई आराखडा तयार करीत आहे. यामध्ये नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळयोजना व हातपंपांची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि विहिरींचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. जून २०२७ पर्यंत ४१५ टँकरची शक्यता प्रशासकीय अंदाजानुसार, मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यात १८० टँकरची आवश्यकता भासू शकते. जून २०२७ पर्यंत ही संख्या ४१५ वर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मे-जून २०२३ मध्ये जिल्ह्यात ४०२ टँकर सुरू होते. त्याद्वारे सुमारे एक हजार ३०० गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. आरक्षणासाठी पुढील आठवड्यात बैठक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. धरणांमध्ये दहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात पाणी आरक्षणाची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणनिहाय पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून उर्वरित साठ्यातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक वसाहतींसाठीच्या वार्षिक पाणी आरक्षणात कपात होण्याचेही संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT