नाशिक

शहराचा शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद

CD
टूडे साठी ------------- पाणी जपून वापरा! उद्या शहराचा पुरवठा बंद कामासाठी १२ ते १८ तासांचा शटडाऊन; रविवारीही कमी दाबाने पाणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : शहरातील प्रमुख पाईपलाईनची दुरुस्ती आणि अत्यावश्यक कामांसाठी महापालिकेने शनिवारी (ता. २४) संपूर्ण दिवसाचा शटडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत १२ ते १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून, रविवारी (ता. २५) सकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे. पूर्व विभागात लेखानगर सर्व्हिस रोड लगत ३०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनवरील गळती बंद करणे आणि कलानगर जलकुंभाची वितरण वाहिनी अस्तित्वातील वाहिनीला जोडणे. पश्चिम विभागात रामराज्य जलकुंभ, त्र्यंबक रोड पीटीसी भिंतीलगत गळती बंद करणे, जीपीओ जलकुंभ येथे नवीन व्हॉल्व बसविणे आणि बी. डी. भालेकर मैदान येथे टी टाकणे हे कामे केली जाणार आहेत. तसेच नाशिक रोड विभागात पाटील गॅरेज मागे मंदिराजवळ, महेशनगर कलंत्री घराजवळ, हांडोरे मळा वडनेर रोड, रेजिमेंटल प्लाझा एचडीएफसी बँकेसमोर दूषित पुरवठा शोधणे, वडनेर चौफुली, देवळाली गाव मिस्तरी इंजिनिअरिंग जवळ, मुक्तिधाम टाकीखालील व्हॉल्व ग्रीसिंग, राजवाडा व्हॉल्व ग्रीसिंग, विहितगाव टाकी आऊटलेट लिकेज बंद करणे आणि जयभवानी टाकीसमोर लिकेज काढण्यात येणार आहे. याचबरोबर पंचवटी विभागात कॅनॉलवरील म्हसरूळ बोरगड उर्ध्ववाहिनी दुरुस्ती, अमृतधाम चौफुलीवर मुख्य वितरण वाहिनीवर क्रॉस कनेक्शन आणि शक्तीनगर नवीन उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन दुरुस्ती. सातपूर विभागात संत कबीरनगर साई मंदिराजवळ व आनंदी आंगन जॉगिंग ट्रॅक आणि सिरीन मिडोजजवळ तिरुमाला ओमकार साईमंदिराजवळ पाईपलाईन गळती बंद करणे, सिडको विभागात पाथर्डी फाटा जलकुंभ व्हॉल्व्ह गळती बंद करणे, स्मशानभूमी अंबडगावजवळ पाइपलाइन गळती बंद करणे, डीजीपीनगर माऊली लॉन्स येथे मुख्य गुरुत्व वाहिनीवरील गळती बंद करणे आणि विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथे व्हॉल्व बसविणे ही कामे केली जाणार आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT