Nashik Lampas jewelry sakal
नाशिक

हात चालाखी करत भरदिवसा साडेचार लाखांचे दागिने लंपास

सराफ असोसिएशन पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिक स्वतः महिलांचा शोध घेत गुन्ह्याची उकल करण्यास अग्रेसर

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भरदिवसा दुकानदाराच्या उपस्थितीत महिलेकडून साडेचार लाखाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली. सराफ असोसिएशन पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिक स्वतः महिलांचा शोध घेत गुन्ह्याची उकल करण्यास अग्रेसर राहिल्याचे चित्र दिसून आले.

संजय दंडगव्हाळ यांच्या भगीरथ ज्वेलर्स दुकानातून बुधवारी (ता. ९) सकाळी चार महिलांकडून दागिने खरेदीचा बनाव करत दुकानदाराच्या उपस्थितीत सुमारे साडेचार लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानदार श्री. दंडगव्हाळ मोबाईल फोनवर बोलत असल्याची संधी साधत चार महिलांनी खरेदीचा बनाव करून दुकानात प्रवेश केला. त्यातील एका महिलेने त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलीच्या मदतीने दागिने असलेली डबी चोरी केली.

प्रथम महिलेने दुकानदाराच्या लक्षात येऊ नये यासाठी तिच्याकडील पर्स आडोसा म्हणून काऊंटरवर ठेवली. तर दुसऱ्या बाजूने बरोबर असलेल्या लहान मुलीने अन्य ग्राहकांच्या लक्षात येऊ नये म्हणून महिलेस आडोसा केला. पर्स आणि लहान मुलीच्या आडोशातून महिलेने काउंटरच्या आत हात टाकून कानातील टॉप्स असलेली डबी अलगद काढून घेतली. त्यात सुमारे साडेचार लाखाचे सोन्याचे ३० टॉप्स असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. काही वेळानंतर टॉप्सची डबी काउंटरमध्ये नसल्याचे लक्षात आले.

श्री. दंडगव्हाळ यांनी दुकानात डबीचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात काउंटरला लागून चार महिला उभे असल्याचे आढळून आले. त्यातील एक महिला काउंटरमध्ये हात घालून चोरी करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. परिसरात चारही महिलांचा शोध घेतला. त्या मिळून आल्या नाही. महिलांनी तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसून आले. सराफ बाजारात घटनेचे वृत्त समजताच सराफ असोसिएशनचे पदाधिकारी अन्य सराफ व्यावसायिकांनी ठीक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दिवसभर सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि महिलांचा शोध घेण्यात दुकानदार सराफा असोसिएशनचे पदाधिकारी आणि अन्य व्यावसायिक व्यस्त असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT