PM Narendra Modi esakal
नाशिक

Nashik Youth Festival : PM मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून हेलिपॅड अन सभास्थळाची पाहणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ तारखेला राष्ट्रींय युवा दिनानिमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ तारखेला राष्ट्रींय युवा दिनानिमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी हेलिपॅड आणि तपोवनातील सभास्थळाची पाहणी केली.

येत्या १२ तारखेला स्वामी विवेकानंद जयंती असून, सदरचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी हे विमानाने ओझर विमानतळ व तेथून हेलिकॉप्टरने मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे येणार आहेत. त्यानंतर ते तपोवनातील साधुग्राम येथे आयोजित सभास्थळी जाणार आहेत. (Nashik Youth Festival wake of PM Modi visit police commissioner inspected helipad venue)

त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.३) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी हिरावाडीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली.

यावेळी उभारण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या जागेची पाहणी करीत काही सूचना यावेळी आयुक्त कर्णिक यांनी दिल्या. त्याचप्रमाणे, तपोवनातील साधुग्राम येथे नियोजित सभास्थळी आयुक्त कर्णिक यांनी भेट देत जागेची पाहणी केली.

नियोजित पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीकोनातून आयुक्तांनी यावेळी अधिकार्यांना बंदोबस्तासह वाहतूक नियोजनाच्या सूचना केल्या. यावेळी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

विशेष पथक येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने त्यापूर्वी विशेष पथकाकडूनही कार्यक्रमस्थळांची व बंदोबस्ताची पाहणी केली जाते. त्यानुसार, येत्या सोमवारी (ता.८) वा मंगळवारी (ता.९) हे विशेष पथक नाशिकला येण्याची शक्यता आहे.

या पथकाकडून पोलिसांच्या बंदोबस्तासह हेलिपॅड आणि सभास्थळाची बारकाईने पाहणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

"मीनाताई ठाकरे विभागीय संकुलाच्या मैदानावर हेलिपॅड उभारण्यात येत असून, तपोवनातील साधुग्राममध्ये नियोजित सभा आहे. या दोन्ही ठिकाणांची पोलीस आयुक्तांसह अधिकार्यांनी पाहणी केली. यावेळी काही सूचना देण्यात आल्या आहेत."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT