Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : नियुक्तीचे आदेश देण्यामध्ये जि. प. ची राज्यात आघाडी! विस्ताराधिकारीपदाची दोघांना नियुक्ती

Nashik News : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल घोषित होऊ लागले आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल घोषित होऊ लागले आहे. यात नाशिक जिल्हा परिषदेने आघाडी घेत नियुक्ती दिली आहे. ‘विस्ताराधिकारी (सांख्यिकी)’ पदाचा निकाल घोषित करून केतन गायकवाड व भरत मोरे या दोघांना नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे या परीक्षांमधील उमेदवारांना नियुक्ती देणारी कदाचित नाशिक जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे. (Nashik ZP Lead in state Appointment marathi news)

सामान्य प्रशासन विभागामधील विस्ताराधिकारी (सांख्यिकी) या पदाच्या परीक्षेत पात्र झालेले व जिल्हा निवड समितीने मान्यता दिल्यानंतर केतन गायकवाड व भरत मोरे यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी वर्षभरापासून प्रक्रिया राबविली जात आहे. यात विविध संवर्गासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून ही परीक्षा घेण्यात आली. विस्ताराधिकारी (सांख्यिकी), आरोग्य पर्यवेक्षक, विस्ताराधिकारी (शिक्षण), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या आठ पदांच्या परीक्षांचे निकाल प्राप्त झाले आहेत. (Latest Marathi News)

अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सर्वाधिक गुण असलेल्या केतन गायकवाड यांना सुरगाणा पंचायत समिती व भटक्या जमाती-ब या प्रवर्गातील सर्वाधिक गुण असलेल्या भरत मोरे यांना येवला पंचायत समिती येथे पदस्थापना देण्यात आली.

"आठ पदांच्या परीक्षांचे निकाल प्राप्त झालेले असून, कार्यवाही सुरू आहे. कनिष्ठ सहाय्यक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा ६ पदांचे निकाल लवकर मिळण्याबाबत प्रशासनाकडून संबंधित कंपनीस व शासनास कळविले आहे."

- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT