Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. विभागनिहाय खर्चाचा आढावा; लेखा व वित्त विभागाकडून अंदाजपत्रकाची तयारी

Nashik ZP : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाकडून यंदाचा अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाकडून यंदाचा अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. यासाठी लेखा व वित्त विभागाकडून विभागनिहाय आढावा घेतला जात आहे. यात प्रामुख्याने गतवर्षी प्राप्त निधी, खर्च निधी तसेच आगामी वर्षातील योजना, निधी याबाबत आढावा सुरू आहे. ()

दोन दिवस हा आढावा चालणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेची लगबग सुरू आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीतील ७२ टक्के निधी खर्च झाला असून २८ टक्के निधी (तब्बल १५५ कोटी) खर्च करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निधी खर्चासाठी केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यातच प्रशासनाला यंदाचे अंदाजपत्रक देखील सादर करायचा असून, साधारण पुढील आठवड्यात प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यापूर्वीच अंदाजपत्रकासाठी लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांना निधी मागणीबाबतचे पत्र दिले होते. बहुतांश विभागांनी निधी मागणी नोंदविली आहे. मात्र, काही विभागांकडून अद्यापही निधीची मागणी झालेली नाही. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी लेखा व वित्त विभागाने विभागनिहाय मॅरेथॉन बैठका सुरू केल्या आहेत.

प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपलेखा वित्त अधिकारी प्रदीप चौधरी गुरुवारी (ता.१५) दिवसभर विभागात ठाण मांडून निधीबाबत आढावा घेत होते. आढाव्यात प्रामुख्याने गतवर्षी कोणत्या योजना होत्या, त्यासाठी निधीची तरतूद, खर्च झालेला निधी याबाबत माहिती घेतली जात आहे.

काही विभागांनी नवीन योजना सादर केल्या आहेत. त्या योजनांबाबत विचारविनिमय केला जात आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील निधी खर्चासाठी केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने खर्चात पिछाडीवर असलेल्या विभागांची झाडाझडती बैठकीत घेतली जात आहे.

हा निधी वेळात खर्च व्हावा यासाठी नियोजन करण्याच्या सूचना लेखा वित्त अधिकारी चव्हाण यांनी संबंधित विभागांना देत आहे. गतवर्षीचे प्रशासनाने ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यात नेमकी किती वाढ होते हे प्रत्यक्ष आढावा झाल्यानंतर समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT