नाशिक

बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. मेन -- जिल्ह्यात ४.६५ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या -- २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन; १ ते १९ वयोगटातील मुलांसाठी विशेष मोहीम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : बालकांची निरोगी वाढ, उत्तम पोषण आणि सुदृढ भविष्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत एक ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ६५ हजार ४३२ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २७ ऑक्टोबरला या मोहिमेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी तीन नोव्हेंबरला विशेष मॉप-अप दिन आयोजित केला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. -- आतड्यांतील जंतसंसर्गाचा थेट परिणाम बालकांच्या शारीरिक वाढीवर, पोषणावर आणि एकूण आरोग्यावर होतो. हा जंतसंसर्ग रोखून बालकांच्या सुदृढ आणि निरोगी विकासाला चालना देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे डॉ. बोडके यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व निमशासकीय शाळा तसेच विविध आरोग्य संस्थांच्या माध्यमातून पात्र बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. या मोहिमेत एकही बालक सुटू नये, यासाठी विशेषतः शाळाबाह्य बालकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जंतसंसर्ग कमी झाल्यास बालकांचे पोषण सुधारेल, त्यांची शारीरिक वाढ योग्य रीतीने होईल आणि आरोग्याच्या विविध समस्या कमी होण्यास मोठी मदत होईल. - विविध विभागांचा समन्वय ही मोहीम जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी बोडके यांच्या नियंत्रणाखाली राबवली जात आहे. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग या सर्वांच्या समन्वयातून जिल्ह्यातील शेवटच्या बालकापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ पालकांना सहभागाचे आवाहन आपल्या पाल्यांच्या निरोगी भविष्यासाठी पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. २७ ऑक्टोबरला एक ते १९ वर्षे वयोगटातील पाल्यांना जंतनाशक गोळी मिळेल याची पालकांनी दक्षता घ्यावी. कारणामुळे या दिवशी गोळी घेता आली नाही तर तीन नोव्हेंबरच्या मॉप-अप दिनाचा अवश्य लाभ घ्यावा. गोळी देताना आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि जंतमुक्त बालपणातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी केले आहे.

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT