National Youth Festival 2024 big platform for Nashik through Yuva Mahotsav Site inspection by CM Shinde esakal
नाशिक

National Youth Festival: युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकला मोठं व्यासपीठ! CM शिंदे यांच्याकडून जागेची पाहणी

पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत नाशिककर करतील. शहर सजविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाची संधी महाराष्ट्राला मिळाली.

यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो. नाशिकचे स्थानिक खेळाडू, कलाकार यांचा या महोत्सवासाठी सहभाग असणार आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ नाशिकला मिळणार आहे.

युवा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रॅण्डिंगची मोठी संधी असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत नाशिककर करतील. शहर सजविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (National Youth Festival 2024 big platform for Nashik through Yuva Mahotsav Site inspection by CM Shinde)

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घघाटनास पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) जानेवारी रोजी तपोवनातील मैदानावर येणार असून, तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आणि महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. ८) घेतला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी साधुग्राम, तपोवन मैदान आणि जत्रा रोड भागातील जागेला भेट देऊन होणाऱ्या कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे उपस्थित होते.

युवा महोत्सवाच्या उद्घघाटन सत्रापूर्वी पंतप्रधान मोदी रोड शो करणार आहेत. राज्य सरकारकडून पंतप्रधानांच्या सार्वजनिक देखाव्याची आणि रोड शो ची तयारी केली जात आहे.

याठिकाणी महापालिका, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना सूचना देत रोड शो च्या मार्गावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहराची स्वच्छता करून सर्व शहर सुशोभीकरण याकरिता अजून तीन चार दिवस हातात आहे.

या कामासाठी महापालिके खासगी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्यातील नाशिक शहराला यजमान पद मिळाले आहे.

यापूर्वी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा प्राणी असलेला शेकरू या लोगोचे अनावर करण्यात आले होते.

महोत्सवासाठी २० कमिटी स्थापना केल्या असून आठ हजारांहून अधिक युवक सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तपोवन साधूग्राम येथे उद्घघाटन, महायुवाग्राम हनुमान नगर, महात्मा फुले सभागृह, रावसाहेब थोरात, उदोजी महाराज बोर्डिंग याठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे.

देशभरातून येणाऱ्या स्पर्धकांना सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठी तयारी सुरु आहे. शहर सुशोभीकरण करण्यावर पालकमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

याकरिता माजी पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या देखील सहभाग असून ते देखील याकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT