नाशिक

शतचंडी यागाच्या पूर्णाहुतीने जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव संपन्न चार लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन; नैवेद्य आरतीने उत्सवाची मंगलमय सांगता

CD
पान-२ मेन -------------- VNI26B13279 वणी ः श्री जगदंबा माता मंदिरासमोर शतचंडी यागास कोहळ्याचा प्रतिकात्मक बळी देताना विश्वस्त राकेश थोरात, यज्ञाचे मानकरी प्रशांत थोरात यांच्यासह भाविक --------- VNI26B13279 वणी ः श्री जगदंबा देवीची विजयादशमी निमित्त पुरोहित सुधीर दवणे यांनी बांधलेली पूजा. ---------- ५०-६ जगदंबा मातेच्या शतचंडी यागाची पूर्णाहुती --------------- नवरात्रोत्सवाची सांगता ः चार लाखांहून अधिक भाविकांकडून दर्शन, कोहळ्याचा प्रतिकात्मक बळी ------------ दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२० : श्रीक्षेत्र वणी येथील श्री सप्तशृंगी मातेचे मूळरूप मानल्या जाणाऱ्या श्री जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची शतचंडी यागाची पूर्णाहुती आणि नैवेद्य आरतीने मंगलमय वातावरणात सांगता झाली. नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता करताना घटी बसलेल्या हजारो महिला भाविकांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. यंदाच्या नवरात्रोत्सवात सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. ------------- श्री जगदंबा मंदिरासमोर सोमवारी (ता.१९) परंपरेनुसार महानवमीच्या निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टतर्फे शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते. यागाचे यजमान प्रशांत नंदकुमार थोरात यांनी सपत्नीक होमयज्ञात आहुती अर्पण केली. रात्री दोनच्या सुमारास ट्रस्टचे विश्वस्त राकेश थोरात यांच्या हस्ते कोहळ्याचा प्रतीकात्मक बळी देण्यात आला. त्यानंतर यजमान, विश्वस्त मंडळ आणि उपस्थित भाविकांच्या सहभागातून शतचंडी यागाची पूर्णाहुती करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या महाआरतीने या धार्मिक विधीची सांगता झाली. यागाचे पौरोहित्य वासुदेव जोशी यांनी केले. मंदिराचे पुजारी सुधीर दवणे यांनी सपत्नीक महाआरती केली. विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. देवीची पंचामृत महापूजा झाल्यानंतर दुपारी बाराला नैवेद्य आरती करण्यात आली. नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस उपवास करून मंदिर परिसरात घटी बसलेल्या महिला तसेच पुरुष भाविकांनी नववस्त्रे परिधान करून देवीचे दर्शन घेतले. पुरणपोळी, खीर, वरण-भात आदी पदार्थांचा नैवेद्य जगदंबा मातेला अर्पण करून भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली. त्यानंतर उपवास सोडून देवीच्या सान्निध्यातून भावपूर्ण वातावरणात भाविकांनी घराकडे प्रस्थान केले. सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी घटी बसलेल्या महिला आणि वणी परिसरातील नऊ दिवसांचे उपवास करणाऱ्या हजारो महिला भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशीही मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला. उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष सोनू थोरात, सचिव रोशन जहागिरदार, सहसचिव रमेश देशमुख, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, पोपटराव थोरात, बाळासाहेब देशमुख, राकेश थोरात, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, सुरेश देशमुख, पुजारी सुधीर दवणे, ट्रस्टचे कर्मचारी आणि पोलिस प्रशासनाने परिश्रम घेतले. १६-१ विविध उपक्रमांनी उत्सवाची रंगत नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत ट्रस्टतर्फे विविध ठिकाणच्या कलाकारांच्या भक्तिसंगीताचे कार्यक्रम, आदिमायेचा जागर, गोंधळ आणि भारुड आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. नवरात्रोत्सवात देवी मुखवट्याची पालखीचे मानकरी सुरेश देशमुख यांच्या निवासापासून परंपरेनुसार ग्रामप्रदक्षिणा करून दररोजचे सवाद्य पालखीचे आयोजन, गर्दीचे नियोजन, मंदिर परिसरातील स्वच्छता, घटी बसलेल्या महिलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि निवाऱ्यासाठी उभारलेला वॉटरप्रूफ मंडप यांसह मोफत फराळ व आरोग्य तपासणी शिबिरासारख्या उपक्रमांमुळे भाविकांना दिलासा मिळाला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : "आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

SCROLL FOR NEXT