लोगो : नवरात्र चिंतन – ८
--
फोटो : H32625
श्री महागौरी देवीची आराधना कल्याणकारी
लीड
नवरात्रीच्या आठव्या माळेला महालक्ष्मीचे पूजन आणि घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो. नवदुर्गांपैकी आजच्या दुर्गेचे रूप महागौरी आहे. महागौरीचा वर्ण पूर्णतः गोरा आहे. तिच्या गौरवर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांच्या शुभ्रतेशी केली जाते. महागौरीची सर्व वस्त्रे आणि आभूषणे पांढऱ्या रंगाची आहेत. महागौरीचे वय आठ वर्षे मानले जात असल्याने ‘अष्टवर्षा भवेद् गौरी’ असे म्हटले जाते.
- लक्ष्मीकांत जोशी, नाशिक
--
तिचे वाहन वृषभ असून ती चतुर्भुजधारी आहे. उजव्या वरच्या हातात अभयमुद्रा आणि उजव्या खालच्या हातात त्रिशूळ आहे. डाव्या वरच्या हातात डमरू असून, दुसरा हात वरमुद्रेत आहे. महागौरीची मुद्रा अत्यंत शांत, हसरी आणि प्रसन्न आहे. भगवान महादेवाशिवाय अन्य कोणीही पती म्हणून नको, असा दृढ भाव मनात ठेवून पार्वतीने शिवप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. तपाचरणामुळे तिचे शरीर काळसर झाले. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर त्यांनी गंगेच्या पवित्र जलाने पार्वतीच्या शरीरावरील सर्व मळ दूर केला. त्यानंतर अत्यंत कांतिमान आणि गौरवर्णीय भगवती सर्वांना दिसू लागली. त्यामुळे तिचे नाव ‘महागौरी’ पडले. महागौरीची शक्ती अमोघ आणि सद्यःफलदायिनी आहे. तिच्या उपासनेने भक्तांची सर्व पापे नष्ट होतात. जीवनातील दैन्य आणि दुःख दूर होते. भक्ताला सर्व प्रकारची पवित्रता आणि अक्षय पुण्य प्राप्त होते. तिची आराधना कल्याणकारी आहे. साधनेच्या प्रगत टप्प्यावर साधकाला महागौरीच्या कृपेने आनंदाची अनुभूती येते. महागौरी माणसाच्या वृत्तीला सत्प्रवृत्तीकडे वळवून असत्याचा विनाश करते. तिचे वंदन करताना आपण म्हणूया,
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.