फोटो -NSK26H33309
नाशिक : प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित ‘नवदुर्गा २०२६’ उपक्रमात सहभागी झालेल्या महिला.
प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेतर्फे
‘नवदुर्गा २०२६’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२२ : नवरात्रातील नऊ रंगांना समाजकार्याच्या नऊ शक्तींची जोड देत प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘नवदुर्गा २०२६’ हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. ‘नऊ रंग, नऊ भूमिका, नऊ शक्ती आणि एकच ध्येय- सामाजिक परिवर्तन’ या संकल्पनेतून समाजातील सकारात्मक बदलाची प्रभावी मांडणी या उपक्रमाद्वारे करण्यात आली.
नवरात्रीच्या प्रत्येक रंगामागे समाजकार्याची एक भूमिका उलगडत नेतृत्व व निर्णयक्षमता, मानवता व सामाजिक सलोखा, युवक सक्षमीकरण, सामाजिक न्याय व समावेशन, शिक्षण व कौशल्य विकास, समुदाय विकास, संघर्षातून उभे राहण्याची जिद्द, वंचितांचा आवाज आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण आणि कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून स्वावलंबनाची ताकद आहे, हा विचारही उपक्रमातून मांडण्यात आला. युवकांना कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधींशी जोडण्यासोबतच समुदायाच्या सहभागातून शाश्वत विकास घडविण्याचा संस्थेचा दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला. या उपक्रमाचा विशेष केंद्रबिंदू महिला सक्षमीकरण हा होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रकल्प प्रमुख विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवदुर्गा २०२६’ची संकल्पना आणि सादरीकरण प्रभावीपणे साकारण्यात आले. समाजकार्य हे केवळ मदतीचे कार्य नसून व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाला सक्षम करून सकारात्मक परिवर्तन घडविण्याची जबाबदारी आहे, हा विचार ‘नवदुर्गा २०२६’च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.