Navratri Festival 2022 
नाशिक

Navratri Festival 2022 : बैठ्या अवस्थेतील देवीची एकमेव मूर्ती

नाशिकमध्ये ६०० वर्षांपूर्वी उभारले मंदिर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील एकमेव बैठ्या अवस्थेतील कालिकामाता मूर्ती जुनी तांबटलेन येथे पाहावयास मिळते. सुमारे ६०० वर्षांपूर्वी कंसारा समाजबांधवांकडून मंदिर उभारले होते. तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही खंड न पडता पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या देवीची महाआरती तसेच नवरात्रोत्सव साजरा होत आहे.

कालिका देवी कंसारा समाजाचे परमदैवत आहे. तांबे, पितळी भांडे घडविण्याचे त्यांचे काम आहे. आपली कला सर्वदूर पोचावी तसेच रोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूने गुजरातमधील चंपानेर येथील कंसारा समाजातील कारागीर तेथून बाहेर पडले. त्यातीलच काही बांधव सुमारे ६०० वर्षांपूर्वी शहरात आले. त्यांनी येताना त्यांचे परमदैवत कालिकादेवीची मूर्तीदेखील आणली.

त्यावेळी जुन्या तांबट आळीत त्यांनी देवीचे लहानसे मंदिर बांधले. १८५७ मध्ये कंसारा समाज संस्थेची स्थापना झाली. जुन्या तांबट आळीमध्ये असलेल्या मंदिराच्या जागी नवीन लाकडी बांधणीची इमारत उभी केली. त्यात कालिका देवीची स्थापना करण्यात आली. कामानिमित्त समाजबांधव देशात कुठेही असो नवरात्रोत्सवात मंदिरातील धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊन दर्शन घेतात. विशेष म्हणजे या ठिकाणी दशमीला होमहवनही केले जाते.

देवीची वैशिष्ट्ये

  • काळ्या पाषाणातील मूर्ती

  • देवीच्या एका हातात धूपपात्र, अन्य तिन्ही हातांत तलवार, त्रिशूळ, डमरू

  • चेहऱ्यावर हास्य, शांत भाव

  • पाणी आणि आयुर्वेदिक उटण्याचा मूर्तीच्या अभिषेकासाठी वापर

  • कुठलाही वज्रलेप न करताही मूर्ती अजून सुस्थितीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT