नाशिक

कळवणच्या आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बंद करा; कार्यकारी अभियंता महिनाभरापासून फिरकलेच नाही , नवरात्र नियोजन बैठकीलाही दांडी

CD
मेन ऐन नवरात्रोत्सवात बांधकाम विभागाची पाठ ----------------------------------- .तर कार्यालयाला कुलूप लावण्याचा आमदारांचा इशारा सकाळ वृत्तसेवा कळवण ता.१८ : सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून संपूर्ण शासकीय यंत्रणा नियोजनासाठी झटत असताना आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मात्र महिनाभरापासून कार्यालयात फिरकलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. नवरात्र नियोजन, पालकमंत्र्यांची बैठक आणि सिंहस्थ कुंभमेळा नियोजन बैठकीलाही त्यांनी दांडी मारल्याने नागरिकांनी कार्यालयच बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर आमदार नितीन पवार यांनी यात लक्ष घालून कामकाजच होणार नसेल तर स्वताच कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. कळवण तालुक्याचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी गडावर नवरात्र उत्सवातील यात्रेचे नियोजन चोख व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ कश्मिरा संखे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दोन महिन्यांपासून सर्व विभाग प्रमुखांच्या वेळोवेळी आढावा बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाचे आधिकारी सक्रिय असताना कळवणचे कार्यकारी अभियंता मात्र याला अपवाद ठरले आहेत. सप्तश्रृंगी गड ते नांदुरी हा सुमारे १० किलोमीटरचा घाट रस्ता अत्यंत अवघड आणि धोकादायक आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण, मजबुतीकरण, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसवणे आणि नवरात्र काळात वाहतुकीचे नियोजन करणे ही सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र कार्यकारी अभियंता महिनाभरापासून कार्यालयात आलेलेच नाहीत. नवरात्र नियोजनाच्या एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला अनुपस्थित होते. घाट रस्त्याच्या कामात गुणवत्ता नावालाही दिसत नसून निकृष्ट दर्जाचे मटेरियल, अपूर्ण काम आणि मनमानी पद्धतीने कामे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ नवरात्रच नाही, तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. मात्र कळवणचा सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून सप्तश्रृंगी गडावरील पर्यायी रस्त्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. प्रस्तावाचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणणे हे कार्यकारी अभियंत्याचे काम असताना त्यांनी पालकमंत्री तथा कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीलाही दांडी मारली. त्यामुळे कार्यकारी अभियंताच कार्यालयात येत नसेल तर हे कार्यालय कायमचे बंद केलेले बरे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोट सप्तश्रृंगी गड हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला कार्यकारी अभियंता गैरहजर राहत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी स्वतः या प्रकरणाची माहिती घेऊन वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे. बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता फिरकतच नसतील तर मी स्वतः कार्यालयाला कुलूप लावेन. नितीन पवार (आमदार कळवण-सुरगाणा) कोट २२२२२२२२२ - कार्यकारी अभियंता (कळवण बांधकाम विभाग) चौकट... नाशिकहून कामकाज कार्यकारी अभियंता सातत्याने गैरहजर राहत असून मुख्यालयात न थांबता नाशिकहून कारभार चालवत असल्याचा आरोप आहे. त्यांच्या उपस्थितीची नोंद, दौरा दैनंदिनी आणि मुख्यालयातील वास्तव्याची पडताळणी बरोबरच विभागात रस्त्यांची झालेल्या दुरवस्था याला जबाबदारी कोणाची हा प्रश्न पडला असून एकूनच कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकरी आत्महत्यांचे सत्र; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन, दुष्काळामुळे चिंता वाढली

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT