(दोन्ही फोटो वापरावेत)
NSK26H32624
जळगाव : चुनरी अर्पण करण्यासाठी निघालेल्या शोभायात्रेत सहभागी महिला.
--
नवरात्रोत्सवातील भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष
भवानी-महालक्ष्मी मंदिरात चुनरी अर्पण; ललिता पंचमीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीचा उत्साह गुरुवारी सुभाष चौक सराफ बाजार परिसरातील श्री भवानी तथा महालक्ष्मी मंदिरात अनुभवायला मिळाला. ढोल-ताशे, बँड पथक, भजन आणि गरब्याच्या तालावर निघालेल्या भव्य शोभायात्रेद्वारे देवीला चुनरी आणि भगवा ध्वज अर्पण करण्यात आला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला.
श्रीराम भक्त हनुमान चुनरी महोत्सव समितीतर्फे चुनरी आणि भगवा ध्वज अर्पण उत्सव घेण्यात आला. शोभायात्रेच्या प्रारंभी रथ चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मारुतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या चुनरी, ध्वज, विविध फळे, सुकामेवा आणि सौभाग्यालंकारांचे पूजन झाले. या वेळी महिलांनी देवीची भजने सादर केली. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत बँड पथकासह हातात चुनरी आणि ध्वज घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. सजविलेल्या बग्गीत प्रीती सराफ यांनी श्री महालक्ष्मी, तर भक्ती रामावत यांनी श्री भवानी देवीचे सजीव रूप साकारले. महिलांनी गरबा खेळत आणि भजनांच्या तालावर ठेका धरत शोभायात्रेचा उत्साह वाढविला. हा कार्यक्रम श्रीराम भक्त हनुमान चुनरी महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता. यशस्वितेसाठी विनोद त्रिपाठी,विश्वनाथ जोशी, विनोद रामावत, सत्यनारायण तिवारी, शशिकला रामावत, सुनय जोशी आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.