sharad pawar eSakal
नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाकडे? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक लोकसभा मदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल असा दावा करण्यात आला होता.

कार्तिक पुजारी

मुंबई- नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक लोकसभा मदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा शरद पवारांनी खोडला आहे. त्यामुळे महाआघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. (ncp chief sharad pawar said about nashik loksabha seat thackeray group disappointed)

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. महविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. १९ तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल म्हणाले होते की, शरद पवार यांनी नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT