नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महामार्गासाठी निवेदन फोटोसह घ्यावे

CD
रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निवेदन सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता.२७ : सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने केलेल्या आंदोलनांनंतर अखेर लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, पाठपुरावा आणि आश्वासनांपुरतेच हे प्रकरण मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाला गती मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. निवेदनात,सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग ७५२ जीच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले, तरी शहरातील काँक्रिटीकरण गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहतुकीचा खोळंबा, धुळीचा त्रास आणि प्रवाशांची गैरसोय नित्याची झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण, खड्ड्यांतील पाण्याचे जलपूजन अशा आंदोलनांतून निषेध नोंदविला. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे फईम शेख, वसंत भामरे, किशोर ह्याळीज, संदीप भामरे, भारत खैरनार, संदीप वाघ, दिगंबर सोनवणे, नंदराज देवरे, दत्ता नंदाळे, नंदकिशोर सोनवणे, दादाजी खैरनार, नानाजी ह्याळीज, तुषार वाघ, आर. टी. सोनवणे, अशोक भामरे, संदीप रौंदळ, रणधीर मोरे, दिलीप खैरनार, मनोज खैरनार, यासीर शेख, गुलाब जाधव, हेमंत मगर, जयंत सूर्यवंशी आदीनी निवेदन दिले.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT