नाशिक

नेहरू चौक मित्र मंडळात शस्त्रपूजन सोहळा

CD
NSK26H33085 जळगाव : नेहरू चौक येथे शस्त्रपूजनप्रसंगी उपस्थित खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे आदी मान्यवर. ............... नेहरू चौक मित्रमंडळात शस्त्रपूजन सोहळा परंपरेचे ४३ वे वर्ष; मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजनही उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : विजयादशमीनिमित्त श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (ता. २०) पारंपरिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या या परंपरेचे यंदा ४३ वे वर्ष होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून परंपरेचे जतन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोघे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक सागर सोनवणे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे आणि नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी उपस्थित होते. यशस्वितेसाठी नेहरू चौक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT