नाशिक

बनकर यांच्या संकल्पनेला चंदे यांची साथ,

CD
पान ३ वर-- शहर जिल्हा -------------- PML26B10255 पिंपळगाव बसवंत ः निफाड एज्युकेशन संस्थेच्या सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी दीपक चंदे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, भास्करराव बनकर आदी. ---------------------- ३६-४ भास्करराव बनकरांचा कार्यकर्तृत्वातून ठसा ------------- खासादर भगरे ः निफाड एज्युकेशन संस्थेच्या अद्ययावत सभागृहाचे उद्घाटन -------------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१९ ः ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांच्या विकासाच्या संकल्पना आदर्शवत आहे. काम करण्याची संधी मिळालेल्या संस्थांवर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. निफाड एज्युकेशन संस्थेच्या प्रगतीतून ते स्पष्ट दिसते. बनकर यांच्या संकल्पनेला बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांची साथ लाभली आहे. त्यामुळेच निफाड एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात अद्ययावत सभागृह उभे राहीले,असे गौरवोद्गार खासदार भास्कर भगरे यांनी काढले. पिंपळगाव येथील निफाड एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात दीपक चंदे यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या (स्व.) यशवंतबाबा महाले सभागृहाच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निफाड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव तर आमदार दिलीप बनकर, गोकूळ गिते, सत्यजित तांबे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, अनिल कदम, ‘मविप्र’च्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होते. खासदार भगरे म्हणाले,‘ पिंपळगाव शहरातील एक उणीव या निमित्ताने भरून निघाली असून विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. समाजहिताचे उपक्रमही घेता येतील. विकासाची दूरदृष्टी व दातृत्व याचा संगम बनकर व चंदे यांनी घडवून आणल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार बनकर म्हणाले,‘ भास्करराव बनकर यांनी जनहितासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या नेतृत्वामुळेच निफाड एज्युकेशन संस्था प्रगतिपथावर असल्याचे दिसते. आमदार गोकूळ गिते म्हणाले,‘ भास्करराव बनकर यांच्या परीसस्पर्शामुळे आमच्या सारखे कार्यकर्ते पदावर पोहचू शकले. बनकर यांचे पिंपळगाव शहर विकासात भरीव योगदान आहे. राजकीय प्रवासात चढउतार आले, पण ते कधीही डगमगले नाही. दीपक चंदे यांच्यातील जाणिवेमुळे अद्ययावत वास्तू साकारली. आमदार सत्यजित तांबे म्हणाले,‘ भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वामुळे निफाड एज्युकेशन संस्थेचा नावलौकीक राज्यभर आहे. बनकर यांनी परिस्थिती ओळखून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन यानिमित्ताने झाले. दीपक चंदे म्हणाले,‘ माझ्या बांधकाम व्यवसायाची ३७ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ भास्करराव बनकर यांच्या सहकार्यामुळे पिंपळगाव शहरात झाली. त्यामुळेच आज मी बांधकाम व्यवसायात नावलौकीक मिळवू शकलो. कार्यक्रमाला द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख, तानाजी बनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर, अविनाश देशमाने, अरुण महाले, नगरसेवक गणेश बनकर, महेश अहिरे, शीतल मोरे, सोनाली जाधव, करसन ठक्कर, संदीप सुराणा, मनोज मुथा, माधवराव ढोमसे, रामभाऊ माळोदे, मंगला जाधव, संजय मोरे, रमाकांत जाधव, भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण खोडे, रामराव हनकर, कांतिलाल पटेल, सुरेश निरगुडे आदी उपस्थित होते. समीर जाधव यांंनी सूत्रसंचालन केले. ---------------- कोट सभागृह उभारणीसाठी चंदे यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी सढळ हाताने सहकार्य केल्याने वास्तू साकारली. सभागृहात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम होऊ शकतील. लोकप्रतिनिधी व खासगी आस्थापनाच्या माध्यमातून निफाड एज्युकेशन संस्थेत पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. - भास्करराव बनकर, उपाध्यक्ष निफाड एज्युकेशन सोसायटी. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale : येरवडा म्हाडा कॉलनी पुनर्विकासावर तोडगा काढू; रामदार आठवले यांचे आश्वासन

Exemption From Examination Fees : दुष्काळग्रस्त २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; पुणे विद्यापीठातील ६५ हजार विद्यार्थ्यांनी केले अर्ज

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

Gokul Election Hasan Mushrif Reaction : गोकुळचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; महायुतीतील भांडणांवर भाष्य; ‘आम्ही निकाल स्वीकारला’

मुंबई ते राजस्थान, व्हाया सुरत! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईतून कसे पसार झाले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT