RTO esakal
नाशिक

Nashik : दुचाकी वाहनांसाठी उद्यापासून नवीन मालिका

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) दुचाकी वाहनांसाठी (एमएच-१५- एचएक्स) ही नविन मालिका (New Number Series) गुरुवार (ता. २३) पासून सुरू करणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. (New series for 2 wheelers at RTO from 23rd June Nashik news)

आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २३ जूनला सकाळी १०. ३० ते २. ३० दरम्यान या कार्यालयाच्या आवक- जावक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. आकर्षक क्रमांकाचे अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार विहित केलेल्या अर्जदाराच्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित केलेली छायांकित प्रत तसेच अर्जदाराचे फोटो ओळखपत्राची साक्षांकित छायांकित प्रत तसेच वाहन वितरकाककडे वाहन नोंदणीसाठी आधारलिंक मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.

कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा शेड्यूल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक (आरटीओ, नाशिक ) यांचे नावे काढून पसंतीच्या नोंदणी क्रमांच्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टव्दारे भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थतीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. तसेच, राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थतीत दुसऱ्या व्यक्ती व संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही. भरलेले शासकीय शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल.

ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावामध्ये भाग घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्काच्या रक्कमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रक्कमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा. ज्या अर्जदारांच्या बोलीच्या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट जास्त रक्कमेचा असेल, अशा अर्जदारासच पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. लिलावामध्ये एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT