Godavari River Sakal
नाशिक

गोदावरीत पाणी कमी, पाणवेलीच जास्त

विनोद बेदरकर

सायखेडा (नाशिक) ते कोपरगाव (नगर) दरम्यान पाहणीत नदीपात्रात पाणी कमी, पाणवेलीच जास्त असे चित्र अनुभवास मिळाले

नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमीतर्फे सुरू असलेल्या निर्मलवारी उपक्रमात सोमवारी (ता.३१) सायखेडा (नाशिक) ते कोपरगाव (नगर) दरम्यान पाहणीत नदीपात्रात पाणी कमी, पाणवेलीच जास्त असे चित्र अनुभवास मिळाले. निर्मलवारी गोदावारी व गोदावरी परिवाराचे निशिकांत पगारे, योगेश बर्वे, राजू शिरसाट व डॉ. प्रभाकर वडजे आदी पदाधिकाऱ्यांनी दौरा केला. (pollution and panweli issue in godavari river nashik)


सायखेडा ते चास (नळी) (ता. कोपरगाव, जि. नगर) पर्यंत चाललेल्या दुसऱ्या टप्प्यात प्रथम दौऱ्यातील ओढा, लालपाडी, सायखेड्यातील तीच अवस्था पुढे करंजगाव ते थेट नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत गोदावरीत वेलींचा जंजाळ पाहायला मिळाला. धरणात अडकून पडलेल्या वेलीच्या पुढे खेडलेजवळून वाहणाऱ्या गोदावरीचे स्वरूप बरे असले तरी, चास नळी गावी गोदावरीची नाशिकमधील दूषित पाणी पुढे गेल्याने तेच पाणी जनावरे, माणसांना प्यावे लागते. वारंवार पाठपुरावा करूनही नदी स्वच्छतेसाठी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.


पाटबंधारे व जलसिंचन विभागाकडे निधी नसल्याने पदरमोड करून नदीची स्वच्छता करावी लागत असल्याचे अधिकारी, ग्रामस्थ, पदाधिकारी यांच्या तक्रारी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नांदूरमध्यमेश्वरपर्यंत नदी दूषित होण्याचे प्रमाण बघण्यात आले. गोदावरी नदीपात्रावरील वेलीच्या थराबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT