नाशिक

जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आज कार्यक्रम

CD
जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आज कार्यक्रम --- वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण; विविध उपक्रमांचे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : उन्हाळा असो, पावसाळा असो, की हिवाळा. भल्या पहाटे उठून वर्तमानपत्रांचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे विविध वाहतूक यंत्रणेमार्फत ही दैनिके वाचकांना घरपोच करावयाची, हा वृत्तपत्र विक्रेत्यांचा नेहमीचा दिनक्रम. वृत्तपत्र विक्रेत्यांचे सर्वसामान्य वाचकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे, पहाटेच त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम ते नित्यनेमाने करतात. तेही, उन, पाऊस, वारा, थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता. वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिवस. आपल्या कष्टाचा गौरव करणारा हा अभिमानाचा दिवस असल्याच्या त्यांच्या भावना आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस. २०१७ पासून ‘सकाळ’ने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यास सुरुवात केली. डॉ. कलाम थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वांना, परिचित आहेत. मात्र, त्यांनी शालेय जीवनात, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वृत्तपत्रवाटप केले होते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. डॉ. कलाम यांनी त्यांच्या विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. त्यांचा हा स्वावलंबी शिक्षणाचा वसा व वारसा पुढे चालविण्यासाठी हा दिवस विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला. गेली अनेक वर्षे, वृत्तपत्र विक्रेता या नात्याने, हे विक्रेते वृत्तपत्र विक्रीची अखंड सेवा देत आहेत. त्याचबरोब संस्कृतीत वाढ व्हावी, म्हणून नवनवीन प्रकाशने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा नेहमीचा प्रतिसाद असतो. याबद्दल सर्वसामान्य वाचकांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील अंक विक्री केंद्रांवर विक्रेता दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध दैनिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, तसेच त्यांच्यासोबत एकत्रित केक कापणे, त्यांना गुलाबपुष्प, पेढे व मिठाई यांचे वाटप आदी माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे विविध संघ, संघटना व पदाधिकाऱ्यांकडून विक्रेत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. --- कोट NSK26H32375 वृत्तपत्र विक्रेते समाज आणि वाचकांमधील महत्त्वाचा दुवा आहेत. ऊन, पाऊस आणि थंडीची तमा न बाळगता पहाटेच घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम ते प्रामाणिकपणे करतात. समाजमाध्यमांच्या युगातही मुद्रित वृत्तपत्रांचे महत्त्व कायम आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडवून त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळवून देणे आवश्यक आहे. - प्रा. नितीन चौधरी, अध्यक्ष, जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशन --- NSK26H32377 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून शासनाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून घोषित केला, याचा मनापासून आनंद आहे. विक्रेत्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार. - विलास वाणी, माजी अध्यक्ष, जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना --- NSK26H32378 माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. वाचनाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांसह सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, हा या दिनामागील प्रमुख उद्देश आहे. वाचन संस्कृती रुजविण्यात वृत्तपत्रांचे मोठे योगदान असून, वाचकांपर्यंत रोज वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या विक्रेतांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. - रवींद्र जोशी, ज्येष्ठ सल्लागार, जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशन --- NSK26H32379 माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्यातून भारताची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जीवन आणि कार्य युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन विद्यार्थ्यांसह सर्वांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याची आणि ज्ञानाची कास धरण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. - गोपाळ चौधरी, केंद्रीय समिती संचालक, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT